Shikhar Dhawan Outstanding Catch Viral Video : आयपीएल २०२३ चा ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दिल्लीचे सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अप्रतिम फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. पण पंजाबचा कर्णधार शिखर धवनने हवेत उडी मारून डेव्हिड वॉर्नरचा अप्रतिम झेल घेत दिल्लीला मोठा धक्का दिला. शिखरने घेतलेल्या जबरदस्त झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सॅम करनच्या गोलंदाजीवर वॉर्नरने उंच मारलेला चेंडू शिखरने स्पायडर मॅनसारखी उडी मारून पकडला अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या.
पहिल्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी ९० हून अधिक धावांची भागिदारी केली. परंतु, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना वॉर्नर सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरने ३१ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तसंच पृथ्वी शॉनेही धडाकेबाज फलंदाजी करत ३८ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रायली रोसोने पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ३७ चेंडूत ८७ धावा कुटल्या.
नक्की वाचा – “नवीन भावा तू आंबा खा फक्त…”, ‘या’ अभिनेत्याच्या ट्वीटमुळं क्रीडाविश्वात खळबळ, कोहलीचे चाहते म्हणाले…
इथे पाहा व्हिडीओ
तर फिल सॉल्टने १४ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी साकारली.पंजाब किंग्जसाठी सॅम करनने भेदक मारा करून वॉर्नर आणि पृथ्वी शॉला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. पंरतु, रोसोने चौफेर फटकेबाजी करण्याचा धडाका सुरुच ठेवला. त्यामुळे दिल्लीच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. रायली रोसोनेही अर्धशतकी खेळी करत दिल्लीची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढवली.