मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यात एका मुंबईकराचाच मोठा वाटा होता, तो मुंबईकर म्हणजे श्रेयस अय्यर. मुंबईविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ८३ धावांची खेळी साकारत त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठी धावसंख्या उभारून दिली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. आपल्या या दमदार फलंदाजीचे श्रेय श्रेयस अय्यरने संघाचे सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना दिले आहे.
‘‘माझ्या या कामगिरीचे श्रेय मी प्रवीण अमरे यांना देईन, कारण त्यांनी माझ्या फलंदाजीच्या तंत्रावर आणि शैलीवर भरपूर मेहनत घेतली. मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वीही त्यांनी माझ्याकडून चांगला सराव करून घेतला होता. त्यामुळे सध्या माझ्याकडून जी चांगली कामगिरी होत आहे. त्याचे श्रेय मी अमरे सरांना देईल,’’ असे श्रेयस म्हणाला.
प्रशिक्षक अमरे यांना श्रेयसचे श्रेय
मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यात एका मुंबईकराचाच मोठा वाटा होता, तो मुंबईकर म्हणजे श्रेयस अय्यर. मुंबईविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ८३ धावांची खेळी साकारत त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठी धावसंख्या उभारून दिली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
First published on: 25-04-2015 at 03:24 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer credits coach praveen amre