गुजरात टायटन्सने आईपीएल २०२२ च्या सामन्यात डेब्यू केला आणि १५ व्या हंगामात सर्वात पहिले प्लेऑफचे तिकीट मिळवले. गुजरातच्या टीमने मंगळवारी (१० मे) पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आईपीएलच्या ५७ व्या लीग सामन्यामध्ये लखनौ सुपरजाएंट्सला ६२ धावांनी पराभूत केले. यासोबतच गुजरात टायटन्स आईपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोचणारी पहिली टीम बनली. गुजरातच्या खात्यात आता १८ गुण आहेत. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोचल्यानंतर शुभमन गिलने ‘कू’वर फोटो शेयर करत म्हटलं, ‘प्लेऑफ कॉलिंग’.
मोहम्मद शमीने फोटो शेयर करत लिहिले, की बॅट आणि चेंडूच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न. सर्व खेळाडू आणि सहकारी स्टाफचे अभिनंदन.
लखनौ सुपर जायंट्सकडे अजूनही प्लेऑफसाठी क्वालिफाय करण्याची संधी आहे. लखनौला अजून दोन सामने खेळायचे आहेत. संघाने एक सामना जिंकला, तर तो अधिकृतपणे प्लेऑफसाठी क्वालिफाय होईल. दोन्ही सामने हरल्यानंतरही संघासाठी प्लेऑफमध्ये पोचण्याच्या संधी तशाच राहील. १६ गुण मिळवलेला संघ आयपीएलच्या इतिहासात कधी प्लेऑफच्या स्पर्धेबाहेर फेकला गेलेला नाही.
हेही वाचा : “… म्हणून मी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर हसलो”, विराट कोहलीने केला खुलासा
दरम्यान, मंगळवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून १४४ धावा काढल्या. रिद्धिमान साहाने ५, मॅथ्यू वेडने १०, हार्दिक पांड्याने ११, डेविड मिलरने २६, शुभमन गिलने ६३ आणि राहुल तेवतियाने २२ धावा केल्या. लखनौकडून २ विकेट आवेश खानला मिळाल्या. विकेट जेसन होल्डर आणि मोहसिन खानला प्रत्येकी एक विकेट मिळाली.