Shubman Gill’s 100th IPL Match : आयपीएल २०२४ चा ४० वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रवेश करताच शुबमन गिलच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवली गेली आहे. तो ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात गुजरातचा पराभव करून दिल्ली संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. त्याचवेळी गुजरातला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिलच्या नावावर विशेष कामगिरीची नोंद-

गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एक विशेष कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा १०० वा सामना आहे. यासह तो पंड्या-पंतसारख्या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा हा युवा फलंदाज ६५ वा खेळाडू आहे. अलीकडेच हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये १०० वा सामना खेळला. २२ एप्रिल रोजी राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात या विशेष कामगिरीबद्दल मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने पंड्याचा गौरव केला.

१०० वा आयपीएल सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू –

आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा शुबमन गिल हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या २४ वर्षे २२९ दिवसात तो १०० वा आयपीएल सामना खेळत आहे. तर राशिद खान या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या २४ वर्षे २२१ दिवसात १०० वा आयपीएल सामना खेळला होता.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

१०० आयपीएल सामने खेळणारे सर्वात तरुण खेळाडू –

२४ वर्षे, २२१ दिवस – राशिद खान
२४ वर्षे, २२९ दिवस – शुबमन गिल
२५ वर्षे, १८२ दिवस – विराट कोहली<br>२५ वर्षे, ३३५ दिवस – संजू सॅमसन
२६ वर्षे, १०८ दिवस – पियुष चावला

शुबमन गिलची आयपीएलमधील कामगिरी –

शुबमन गिलच्या आयपीएल २०२४ मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. यामध्ये युवा फलंदाजाने १४६.८० च्या स्ट्राईक रेटने २९८ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९* धावा आहे. आयपीएलमध्ये एकूण ९९ सामने खेळलेल्या गिलने ३०८८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३५.२० आहे. त्याचवेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या १२९ धावांची आहे. गिलच्या नावावर आयपीएलमध्ये तीन शतके आणि १० अर्धशतके आहेत.

हेही वाचा – VIDEO : RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या खेळाडूला बसला १० हजार रुपयांचा फटका, सराव सत्रात लागली खिशाला कात्री

ऋषभच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचे गुजरातला २२५ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ४ गडी गमावून २२४ धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने ४३ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ८ षटकार आले. तर अक्षर पटेलने ४३ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. पटेलच्या बॅटमधून ५ चौकार आणि ४ षटकार आले. पंत आणि पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. शेवटी ट्रस्टन स्टब्स सात चेंडूत २६ धावा करून नाबाद माघारी परतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill became the second youngest player to play 100th matches in dc vs gt match in ipl vbm