Shubman Gill fined 12 lakhs for slow over rate : आयपीएलची विजयाने सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला दुसऱ्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून ६३ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार शुबमन गिलला आणखी एक धक्का बसला आहे. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे गिलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह, तो आयपीएल २०२४ मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दंड भोगणारा पहिला कर्णधार बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२४ मधील कोणत्याही संघासाठी हा पहिला स्लो ओव्हररेट दंड आहे. आयपीएलने जारी केलेल्या एका निवेदनात सांगितले की, ‘गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. गिलला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर आचारसंहितेअंतर्गत हंगामाच्या पहिल्या गुन्ह्यासाठी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलला स्लो ओव्हर रेटची शिक्षा झाली होती. प्रत्यक्षात एक षटक उशिरा टाकल्याने शेवटच्या षटकात ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त ४ खेळाडूंना परवानगी होती. जर त्याने षटके वेळेत पूर्ण केली असती, तर तो ५ खेळाडूंना सर्कलच्या बाहेर ठेवू शकला असता. मात्र, एक खेळाडू कमी असल्याने त्यांना फारसे नुकसान झाले नाही, कारण मोहित शर्माच्या या षटकात केवळ ८ धावा गेल्या.

हेही वाचा – IPL 2024: CSK vs GT सामना जडेजासाठी ठरला खास, सीएसकेच्या चाहत्यांनी ८ मिनिटे जागेवर उभं राहत दिली मानवंदना, काय आहे कारण?

एका सामन्याच्या बंदीचीही आहे तरतूद –

सध्या शुबमन गिलला फक्त दंड ठोठावण्यात आला आहे, मात्र आगामी सामन्यांमध्ये तो पुन्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही लागू शकते. खरेतर, यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास गिलला ३० लाख रुपये आणि संघातील उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या २५ टक्के (जे जास्त असेल) दंड ठोठावला जाईल. तिसऱ्यांदा असे घडल्यास ३० लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. तसेच, उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५० टक्के (जे जास्त असेल) दंड ठोठावला जाईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill fined 12 lakhs for slow over rate in gt vs csk match ipl 2024 at ma chidambaram stadium chennai vbm