Shubman Gill Press Conference : गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज शुबमन गिलने आयपीएल २०२३ मध्ये केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात शुबमनने वादळी शतक ठोकलं. सामना संपल्यानंतर शुबमनने माध्यमांशी संवाद साधताना त्याच्या फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. शुबमनने त्याच्या फलंदाजीत काय बदल केले, याबाबत खुलासा केला. टी-२० वर्ल्डकपनंतर टेक्निकमध्ये बदल केला होता, असं शुबमन म्हणाला.

माध्यमांशी बोलताना शुबमन पुढे म्हणाला, “मी माझ्या खेळावर काम करत आहे. मी टी-२० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड सीरिजच्याआधी फलंदाजीत काही सुधारणा केल्या आणि टेक्निकमध्येही बदल केले. मैदानाच्या बाहेर तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवल्या जातात. परंतु, मैदानात असताना तुम्हाला संघासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावं लागतं. मला वाटतं माझ्या आयपीएल करिअरमधील ही सर्वात बेस्ट इनिंग आहे.”

Sanjay Raut on Uddhav Devendra meeting (1)
“तू राहशील किंवा मी”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन; राऊत म्हणाले, “तोफा थंडावल्या”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
Dhananjay Munde On Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”
Jason Gillespie Statement on Pakistan Cricket Board Slams PCB and Details Reason About Resignation
Jason Gillespie on PCB: “हाच तो क्षण जेव्हा वाटलं…”, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनागोंदीबाबत गिलेस्पी यांनी केला गौप्यस्फोट, राजीनामा देण्यामागचे सांगितले कारण
Shocking video
“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Vinod Kambli on Family
Vinod Kambli: “माझा मुलगा डावखुरा फलंदाज, तोही माझ्यासारखाच…”, विनोद कांबळी आजारपणात कुटुंबाबाबत काय म्हणाले?
D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

नक्की वाचा – मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास! गुजरात टायटन्सचा ६२ धावांनी दणदणीत विजय, GT ने गाठली IPL ची अंतिम फेरी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानेही शुबमन गिलचं कौतुक केलं. माध्यमांशी संवाद साधताना पांड्या म्हणाला, शुबमनकडे जी क्लॅरिटी आणि आत्मविश्वास आहे, तो खूप जबरदस्त आहे. मुंबईविरोधात खेळलेली इनिंग त्याच्या सर्वात चांगल्या इनिंगपैकी एक होती. तो कधीच घाईत असल्यासारखा दिसला नाही. आंतरराष्ट्रीय आणि फ्रॅंचायजी क्रिकेटमध्ये तो सुपरस्टार खेळाडू बनले.

गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार होतं. परंतु, गुजरातच्या मोहित शर्माने आणि मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केल्यामुळं मुंबई इंडियन्सचा संघ १७१ धावांवर गारद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली असून गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Story img Loader