Royal Challengers Bangalore vs Gujrat Titans Match Update : आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत या सामन्यातही शतकी खेळी केली. परंतु, विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी कमाल केली. विजय शंकर आणि शुबमन गिलने चौफेर फटकेबाजी करत गुजरातला या सामन्यात विजय मिळवून दिला. शुबमन गिलने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने ४ विकेट्स गमावत १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा