Shubman Gill’s century broke the records of many legends: आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना मुंबई आणि गुजरात संघात शुक्रवारी खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडलेल्या सामन्यात गुजरातने ६२ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर अतिंम फेरीत धडक मारली. या सामन्यात गुजरातसाठी शतकवीर शुबमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने आपल्या शतकाच्या जोरावर एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे.
शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी खेळली, जी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती. याशिवाय आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने वयाच्या २३ वर्षे २६० दिवसात आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावले. एवढेच नाही तर आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफ सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने आयपीएलमधील प्लेऑफमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात गुजरातने २० षटकात ३ विकेट गमावत २३३ धावा केल्या.
शुबमन गिलने ऋषभ पंतचा विक्रम मोडला –
शुबमन गिलने १२९ धावांची खेळी खेळून ऋषभ पंतचा विक्रम मोडला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, ऋषभ पंत नाबाद १२८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. आयपीएल मधील सर्वात मोठी खेळी करणार भारतीय फलंदाज म्हणून केएल राहुल १३२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमधील भारतीय फलंदाजांची सर्वोच्च धावसंख्या –
१३२* धावा – केएल राहुल
१२९ धावा – शुबमन गिल
१२८* धावा – ऋषभ पंत
१२७ धावा – मुरली विजय
वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला –
आता आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुबमन गिलच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता, ज्याने सीएसकेविरुद्ध १२२ धावा केल्या होत्या. आता गिलने सेहवागला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू बनणार कोट्याधीश, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम
आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च धावसंख्या –
१२९ धावा – गिल विरुद्ध एमआय
१२२ धावा – सेहवाग विरुद्ध सीएसके
११७* धावा – वॉटसन विरुद्ध एसआरएच
११५* धावा – साहा विरुद्ध केकेआर
आयपीएलच्या एका मोसमात ८०० हून अधिक धावा –
विराट कोहली (२०१६)
डेव्हिड वॉर्नर (२०१६)
जोस बटलर (२०२२)
शुबमन गिल (२०२३)
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा –
९७३ धावा – विराट कोहली (आरसीबी, २०१६)
८६३ धावा – जोस बटलर (आरआर, २०२२)
८५१ धावा – शुबमन गिल (जीटी, २०२३)
८४८ धावा – डेव्हिड वॉर्नर (एसआरएच, २०१६)
७३५ धावा – केन विल्यमसन (एसआरएच, २०१८)
आयपीएल प्लेऑफमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार –
१० – शुबमन गिल (जीटी) विरुद्ध एआय, अहमदाबाद, २०२३ क्वालिफायर-२
८ – वृद्धीमान साहा (पीबीकेएस) विरुद्ध केकेआर, बंगळुरू, २०१४ फायनल
८ – ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध एसआरएच, बंगळुरू, २०१६ फायनल
८ – वीरेंद्र सेहवाग (पीबीकेएस) विरुद्ध सीएसके, मुंबई , २०१४ क्वालिफायर -२
८ – शेन वॉटसन (सीएसके) विरुद्ध एसआरएच, मुंबई , २०१८ फायनल