आयपीएल २०-२० क्रिकेट स्पर्धेसाठी सट्टेबाजी करणाऱ्या ५ उच्चभ्रू व्यापारी व मुख्य सट्टेबाजास औरंगाबाद गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून १९० हँडसेट, ६ लाख ४ हजार ८९० रुपये व ४ महागडय़ा चारचाकी गाडय़ा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. नरेश धर्माजी पोतलवाड (वय ३५) या आरोपीच्या घरातून सट्टेबाजीसाठी केल्या जाणाऱ्या मोबाइल कनेक्शनचे जाळेच पोलिसांना आढळले. मराठवाडय़ातील प्रमुख शहरांसह दिल्लीपर्यंत सट्टेबाजांची साखळी असून, यात एखादा क्रिकेट खेळाडूही सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.

Story img Loader