Sourav Ganguly Latest News Update : दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी अरूण जेटली स्टेडियममध्ये आयपीएल २०२३ मध्ये पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा चार विकेट्स राखून पराभव केला. अशातच दिल्ली कॅपिटल्सचे फ्रॅंचायजी डायरेक्टर सौरव गांगुली खूश नसल्याचं समोर आलं आहे. त्यांनी टीमच्या फलंदाजांना धारेवर धरलं. आम्ही या सामन्यात नशिबवान ठरलो, असं गांगुली म्हणाला.

सामना संपल्यानंतर गांगुली म्हणाला, आज आम्हाला नशीबाने साथ दिली. आम्ही या हंगामाच्याआधीही चांगली गोलंदाजी केली होती. परंतु, समस्या फलंदाजीत आहे. आम्हाला स्वत:ला पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही चांगलं प्रदर्शन कसं करू शकतो, हे पाहण्याची आम्हाला गरज आहे. फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही चांगलं खेळलो नाही, याबाबत मला माहित आहे. आम्हाला चांगली फलंदाजी कशी करता येईल, यावर चांगला उपाय शोधण्याची गरज आहे.

नक्की वाचा – टॉप फॉर्म मिळवण्यात यशस्वी का झालो? मोहम्मद सिराजने केला खुलासा, म्हणाला, “कोरोना काळात…”

गांगुली पुढे म्हणाला, आम्ही खेळाडूंसोबत खूप मेहनत घेऊ आणि त्यांना फॉर्ममध्ये परत आणू. मग यात पृथ्वी शॉ असो, मनीष पांडे किंवा मिचेल मार्श असो. या खेळाडूंनी टीमसाठी याआधी खूप मोठं योगदान दिलं आहे. आमच्याकडे एक दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर आम्ही हैद्राबादसाठी उड्डाण घेऊ. तिथे फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असेल, अशी आशा आहे. मी डगआऊटमध्ये बसलो होतो. तेव्हा असा विचार करत होतो की, हे माझं पहिलं टेस्ट रन करण्यासारखं आहे.

Story img Loader