Controversy over Avesh Khan’s full toss ball: आयपीएलच्या ५८व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आहेत. शनिवारी (१३ मे) सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले. प्रेक्षक गॅलरीतील एका व्यक्तीने लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध गैरवर्तन केले.

वास्तविक, सामन्याच्या १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर सर्व वाद सुरू झाला. आवेशच्या फुल टॉस चेंडूवर अब्दुल समदने एक धाव घेतली. फलंदाजासाठी तो धोकादायक चेंडू होता. त्यामुळे अंपायरने नो-बॉल घोषित केला. यावर लखनऊचा कर्णधार क्रृणाल पांड्याने या नो-बॉलच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय बदलला. त्यानतर नो-बॉलचा निर्णय मागे घेण्यात आला. यावर अब्दुल समद खूश नव्हता, त्यामुळे याबाबत त्यांनी लेग अंपायरकडे तक्रार केली.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

पंचांनी प्रकरण शांत केले –

आवेश खानने चौथ्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला एकही धाव काढू दिली नाही. दरम्यान, मैदानावरील पंच लखनऊ डगआऊटजवळ पोहोचले होते आणि सपोर्ट स्टाफशी बोलत असल्याचे दिसून आले. सनरायझर्स हैदराबादचे फिरकी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांच्याशी ते बोलत होते. यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. एका फोटोमध्ये अंपायर मुरलीधरनला नट बोल्ट दाखवत आहेत.

हेही वाचा – IPL 2023: यशस्वी जैस्वालच्या आयुष्यात ‘या’ दोन शब्दांना खूपच महत्त्व; हातावर बनवला आहे टॅटू

प्रेक्षकांनी गंभीरला डिवचले –

दुसरीकडे याच घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सनरायझर्सचे चाहते लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यावर निराश झाल्याचे समजते. विराट कोहलीचे नाव घेऊन ते गंभीरला चिडवत आहे. ज्यावर गंभीरही नाराज दिसत आहे.

हेही वाचा – VIDEO: युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्माचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

सामन्याबद्दल बोलायचे तर, हेन्रिक क्लासेनने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात क्लासेनने आपली विकेट गमावली. त्याचे अर्धशतक हुकले आणि तो २९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. अब्दुल समदने २५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार दोन धावा करून नाबाद राहिला.

Story img Loader