SRH vs RR Highlights in Marathi: राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली झुंज दिली, पण हैदराबादच्या डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. २८७ धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही राजस्थान संघावर ४४ धावांनी विजय मिळवू शकले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनीही हैदराबादच्या गोलंदाजांची शाळा घेतली पण पॉवरप्लेमध्ये संघाने गमावलेल्या विकेट्समुळे राजस्थानचा संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही.
इशान किशनच्या शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ही मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजी करताना त्याने केवळ ४७ चेंडूत २२५ च्या स्ट्राईक रेटने ११ चौकार आणि ६ षटकारांसह १०७ धावा केल्या.त्याच्या झंझावाती खेळीमुळे हैदराबाद संघाने २८७धावांचे मोठे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ २४२ धावा करू शकला. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी स्फोटक खेळी खेळून सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना या कामगिरीत यश आले नाही.
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि रियान परागच्या रूपाने दोन झटके बसले. सिमरजित सिंगने दोन्ही फलंदाजांना बाद करून राजस्थान संघावर दडपण आणलं. पण असे असतानाही संजू सॅमसन एका टोकाकडून षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत होता. त्यानंतर ५व्या षटकात नितीश राणाही मोहम्मद शमीचा बळी ठरला. यानंतर ध्रुव जुरेलने सॅमसनसह संघाचा डाव सावरला. दोघांनीही वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आणि शतकी भागीदारी करून संघाला पुन्हा रुळावर आणले.
मात्र १११ धावांची ही भागीदारी १४व्या षटकात तुटली. १७८च्या स्ट्राईक रेटने ३७ चेंडूत ६६ धावा करून सॅमसन हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर दोन चेंडूत, २०० च्या स्ट्राइक रेटने ३५ चेंडूत ७० धावा करून जुरेलही बाद झाला. ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर राजस्थानची गाडी पुन्हा रुळावरून घसरली. पण शिमरन हेटमायर आणि शुभम दुबे यांनीही मोठी फटकेबाजी केली, पण ते आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. हेटमायरने २३ चेंडूत १८२ च्या स्ट्राईक रेटने १ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावा केल्या. तर शुभमने ११ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. अशाप्रकारे संपूर्ण संघ २० षटकांत केवळ २४२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेल्या रियान परागने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी एसआरएचसाठी स्फोटक सुरुवात केली. या दोघांनी मिळून पहिल्या ३ षटकांत ४५ धावा केल्या. यानंतर अभिषेक ११ चेंडूत २४ धावा करत बाद झाला. यानंतर इशान किशनने प्रथमच फ्रँचायझीकडून खेळताना वादळी शतक झळकावले.
इशानने अवघ्या ३५ चेंडूत ८५ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात ३१ चेंडूत ६७ धावा करून हेड तुषार देशपांडेचा बळी ठरला. पण किशनने आपली तुफानी फलंदाजी सुरूच ठेवत ४५ चेंडूत शतक झळकावले. इशान किशन शतक झळकावत नाबाद परतला, त्याने ४७ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय नितीश रेड्डी याने १५ चेंडूत ३० धावा आणि हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत ३४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अशाप्रकारे हैदराबादने पहिल्या डावात २८६ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. सर्वात जास्त धावा सर्वाेत्कृष्ट गोलंदाज जोफ्रा आर्चरविरूद्ध सर्वाधिक धावा केल्या. जोफ्रा आर्चरला ४ षटकांत एकही विकेट मिळाली नाही आणि सर्वाधिक ७६ धावा दिल्या. यानंतर ३ षटकांत फजलहक फारूकीने ४९ धावा दिल्या आणि एकही विकेट दिली नाही. महिश तीक्ष्णाला ४ षटकांत २ विकेट मिळाले आणि त्याने ५२ धावा दिल्या. संदीप शर्माने १ विकेट घेत ५१ धावा दिल्या. तर तुषार देशपांडेने ३ विकेट घेत ४४ धावा दिल्या.