Kavya Maran’s celebration video viral : आयपीएल २०२४ च्या ५०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या रोव्हमन पॉवेलला एलबीडब्ल्यू आऊट करून हैदराबादला एका धावेने रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद संघांची मालकीन काव्या मारनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. काव्या मारनने हवेत उडी मारून अनोख्या पद्धतीने आपल्या संघाच्या विजयाचे सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काव्या मारनच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल –

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी काव्या मारनच्या सेलिब्रेशनची तुलना ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘Siuuuu’ सेलिब्रेशनशी केली. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने डावाच्या सुरुवातीलाच पहिल्या षटकात जोस बटलर आणि संजू सॅमसन यांना शून्यावर बाद करत हैदराबाद संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर शेवटच्या षटकांत सनरायझर्स हैदराबाद संघ अडचणीत असताना तो धावून आला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना, त्याने रोव्हमन पॉवेलला बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केला. यानंतर भुवनेश्वर कुमारची ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. सनरायझर्स हैदराबाद जिंकताच काव्या मारनने आनंदाने हवेत झेप घेतली.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे. काव्या मारन खूप सुंदर असून सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ आहे. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट सन एनएक्सटीची प्रमुख आहे. काव्या मारन स्वतः सन म्युझिकशी संबंधित आहेत. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्याने तिचे वडील कलानिधी मारन यांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला होता. काव्याने तिच्या कंपनीत मोठ्या पदावर जाण्यापूर्वी अनुभव मिळविण्यासाठी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिपही केली होती.

हेही वाचा – Josh Baker : क्रिकेट विश्वावर शोककळा, ‘या’ खेळाडूने वयाच्या २० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हैदराबादने राजस्थानचा केला पराभव –

नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा एका धावेने पराभव केला. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती, परंतु भुवनेश्वर कुमारने (४१ चेंडूत ३ विकेट्स) रोव्हमन पॉवेलला (१५ चेंडूत २७) एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यामुळे संघाला २०२ धावांच्या पाठलाग करताना ७ गडी गमावून केवळ २०० धावाच करता आल्या. अर्धशतक झळकावण्याबरोबरच रियान पराग (७७) आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल (६७) यांनीही तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावा जोडल्या, पण ते राजस्थानला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. भुवनेश्वरशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Story img Loader