SRH Owner Kavya Maran Love Life: आयपीएल २०२५ मधील सनरायझर्स हैदराबाद संघ आपल्या विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील तीन सर्वात मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत. या सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण आहे काव्या मारन. काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कलानिधी मारन यांची लेक आहे. काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. पण आता काव्या मारन कोणाला डेट करत आहे, अशा चर्चा सुरू आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ चा गतविजेता संघ आहे. यंदाच्या आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २८६ धावा करत आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. तर संघाला दुसऱ्या सामन्यात म्हणजेच लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील काव्या मारनच्या प्रतिक्रियेचे फोटो-व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काव्या मारन ही क्रिकेटप्रेमी आहेच, पण त्याचबरोबर तिच्या सौंदर्याची चर्चाही होत असते. काव्या मारन तिच्या उपस्थितीने आणि सौंदर्याने आयपीएलमधील तिच्या संघाच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. काव्या मारन आयपीएल सामन्यांदरम्यान इतकी चर्चेत असते की चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असतात. सध्या काव्या मारनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू आहे.

काव्या मारन नेमकं कोणाला करतेय डेट?

काव्या मारनचं नाव काही सेलिब्रिटींबरोबर जोडलं गेलं होतं. पण सध्या काव्या मारन दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक अनिरूद्ध रविचंदरला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. अनिरूद्ध आणि काव्या एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. अनिरूद्ध हा त्याच्या व्हाय दिस कोलावेरी डी या गाण्यामुळे प्रसिद्ध होतात. काही दिवसांपूर्वी अनिरूद्ध चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यापूर्वी परफॉर्मन्स सादर करताना दिसला.

पण अनिरूद्ध रविचंदरच्या टीमने हे काव्या आणि अनिरूद्ध डेट करत असल्याच्या अफवा खेटो असल्याचे सांगितले. ते दोघेही फक्त चांगले मित्र आहेत आणि त्याहून जास्त काहीच नाही, असे त्याच्या टीमने म्हटले. अनिरूद्ध रविचंदर याला सर्वात महागडा आणि श्रीमंत गायक असल्याचे म्हटले जात आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्ट्सच्या मते, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला संगीत देण्यासाठी अनिरूद्धने तब्बल १० कोटी रुपये मानधन स्वीकारले होते. यादरम्यान त्याने ७-८ कोटी रूपये मानधन स्वीकारणाऱ्या ए.आर. रहमान आणि प्रीतमला मागे टाकलंय.

सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. पॅट कमिन्स हा यंदाच्या आयपीएलमध्ये एकमेव विदेशी कर्णधार आहे. तर इतर सर्व ९ संघांचे खेळाडू हे भारतीय खेळाडू आहेत. आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिला सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवासह हैदराबादचा संघ थेट सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर पहिल्या स्थानी आरसीबीचा संघ आहे.