Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Updates: आयपीएलच्या ४७व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी मधल्या फळीत भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत १७१ धावांत रोखले. त्यांचे नऊ फलंदाज बाद झाले. हैदराबादला विजयासाठी १७२ धावा कराव्या लागतील. कोलकाताकडून रिंकू सिंगने ४६ , कर्णधार नितीश राणाने ४२, आंद्रे रसेलने २४, जेसन रॉयने २० आणि अनुकुल रॉयने नाबाद १३ धावा केल्या. या पाच खेळाडूंशिवाय दुहेरी आकडा कुणालाही स्पर्श करता आला नाही. हैदराबादकडून मार्को जॅनसेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे आणि एडन मार्कराम यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.
यापूर्वी आयपीएल २०२३ च्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते, हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. त्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सनेही खूप प्रयत्न केले पण त्यांना २० षटकांत ७ गडी गमावून २०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. गुणतालिकेत कोलकाता आठव्या तर हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-११
सनरायझर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.