आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादची (SRH) सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात राजस्थानकडून संघाचा पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याची लखनौ सुपर जायंट्सशी (एलएसजी) स्पर्धा आहे. एकना स्टेडियमवर एडेन मार्करामने नाणेफेक जिंकली आणि हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीला आला. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर संघाला केवळ १२१ धावा करता आल्या. लखनौच्या फिरकीपटूंची अप्रतिम कामगिरी. हैदराबाद फ्रँचायझीच्या सीईओ काव्या मारनही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या आहेत.
विकेट पडल्यावर डान्स केला- काव्या मारन
प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात दमदार झाली. काइल मेयर्स आणि केएल राहुलने गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ३५ धावा होती. ५व्या षटकात फजलहक फारुकीने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. त्याने फेकलेल्या चेंडूवर मेयर्सने पुल शॉट खेळला. पण चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगला गेला आणि तिथे क्षेत्ररक्षण करताना मयंक अग्रवालने त्याचा सहज झेल घेतला.
संघाला पहिले यश मिळाल्यानंतर काव्या मारनचा आनंद पाहण्यासारखा होता. ती आनंदाने ओरडत तिच्या सीटवरून उड्या मारत होती, त्यानंतर तिने थोडासा डान्सपण केला. तिच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यात ना सनरायझर्सची फलंदाजी चांगली झाली ना त्यांचे गोलंदाज रंगात दिसले, त्यामुळे या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन देखील लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये नेहमीप्रमाणे हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती आणि कदाचित तिलाही वाटले नसेल की नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली तिचा संघ इतकी वाईट कामगिरी करेन.
काव्या मारनवर मजेदार मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस
सनरायझर्स हैदराबादच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर, फ्रँचायझीची मालक, काव्या मारन ट्रोल्सच्या निशाण्यावर आली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काव्या मारनच्या मीम्सचा पूर आला. काव्या मारनची सर्वात मोठी गंमत म्हणजे त्याने हॅरी ब्रूकसारख्या खेळाडूला मोठ्या रकमेत विकत घेतले, जो स्वत:ला सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. क्षणात आनंद तर क्षणात दुख असे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्याने व्यवस्थित टिपले आहेत. तिला सोशल मीडिया सेन्सेशन असेही म्हटलं तर वावगं ठरणार नाही.