IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ७ विकेट्सने पराभव करत विजयाचा चौकार लगावला आहे. मुंबईने या विजयासह आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रोहित शर्माच्या ७० धावा तर सूर्याच्या ४० धावांच्या जोरावर मुंबईने या विजयाची नोंद केली. तर पहिल्या डावात ट्रेंट बोल्टने ४ विकेट्स घेतले आणि चहरने २ विकेट्सने घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.
IPL 2025 MI VS SRH Highlights: आयपीएल २०२५ सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स
रोहित शर्मा आणि सूर्यादादाची फटकेबाजी व भेदक गोलंदाजीसह मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय नोंदवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रोहित शर्माने ७० धावांची तर सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ४० धावांची खेळी करत मुंबईला चौथा सहज विजय मिळवून दिला.
हिटमॅन रोहित शर्मा मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेत झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सला ३० चेंडूत ७ धावांची गरज आहे. रोहित शर्माने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या.
SRH vs MI Live: रोहित शर्माचं अर्धशतक
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हिटमॅन रोहित शर्माने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. रोहित शर्माने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही वेळेस वादळी तर काही वेळेस सावध फलंदाजी करत रोहितने २०१६ नंतर पहिल्यांदाच सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे.
SRH vs MI Live: विल जॅक्स झेलबाद
सामन्यातील झीशानच्या १०व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विल जॅक्स झेलबाद झाला. यासह मुंबईने १० षटकांत २ बाद ७९ धावा केल्या आहेत.
SRH vs MI Live: पॉवरप्ले
हैदराबादने दिलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये १ बाद ५६ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २७ धावा तर विल जॅक्स १८ धावा करत खेळत आहे.
SRH vs MI Live: वादळी फटकेबाजी
कमिन्सच्या तिसऱ्या षटकात विल जॅक्स आणि रोहित शर्माने शानदार फटकेबाजी करत १७ धावा केल्या. रोहितने दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर षटकार-चौकार लगावला. तर विल जॅक्सने अखेरच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला.
सनरायझर्स हैदराबादकडून मुंबई इंडियन्स विरूद्ध सामन्यात जयदेव उनाडकटला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. त्याने सामन्यातील पहिल्याच षटकात विकेट घेत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. उनाडकटने दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिकल्टनला झेलबाद केलं. यासह जयदेव उनाडकटने आयपीएलमध्ये आपले १०० विकेट पूर्ण केले आहेत.
ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकात अभिनव मनोहर आणि पॅट कमिन्स यांनी विकेट्स गमावल्या. यासह हैदराबादने २० षटकांत १४३ धावा केल्या आहेत. तर मुंबईला विजयासाठी १४४ धावांचं आव्हान दिलं आहे. ९ षटकांत ३५ वर ५ विकेट्स अशी स्थिती असताना क्लासेन आणि इम्पॅक्ट प्लेअर अभिनव मनोहर यांनी ९९ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
SRH vs MI Live: हेनरिक क्लासेन आऊट
बुमराहच्या १९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेनरिक क्लासेन झेलबाद झाला. यासह बुमराहने अखेरीस ९९ धावांची भागीदारी तोडली. क्लासेनने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ७७ धावा करत बाद झाला.
SRH vs MI Live: सूर्याने सोडला झेल
सूर्यकुमार यादवचा टी-20 विश्वचषकातील झेल आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. पण आजच्या सामन्यात सूर्याकडून झेल सुटला. सर्वच जण चकित झाले. बुमराहच्या चेंडूवर अभिनव मनोहरने मोठा फटका खेळला पण सूर्याच्या हातात चेंडू आल्यानंतर बाऊन्सने बाहेर पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागून लांब गेला. यासह अभिनवचा 33 धावांवर त्याचा झेल सुटला.
SRH vs MI Live: अभिनव मनोहरची फटकेबाजी
अभिनव मनोहरने बुमराहच्या १७व्या षटकात दोन चौकार तर १३व्या षटकात शानदार गगनचुंबी षटकार लगावला होता. यासह १७व्या षटकात हैदराबाद संघाने ५ बाद ११० धावा केल्या आहेत.
हेनरिक क्लासेनने मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करत पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. क्लासेनने ३४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. क्लासेनने डगमगलेल्या हैदराबादचा डाव सावरत संघाची धावसंख्या १०० धावांच्या आसपास नेलं आहे. यासह हैदराबादने १५ षटकांत ५ बाद ९० धावा केल्या आहेत.
SRH vs MI Live: हेनरिक क्लासेनची फटकेबाजी
विघ्नेश पुथूरच्या १०व्या षटकात हेनरिक क्लासेनने फटकेबाजी केली. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावत १५ धावा केल्या. तर हार्दिकच्या ११ व्या षटकात ३ चौकार लगावत १६ धावा केल्या.
हार्दिकच्या पंड्याच्या नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अनिकेत वर्मा झेलबाद झाला. 12 धावा करत अनिकेत झेलबाद झाला. यासह हैदराबादने 9 षटकात 5 बाद 37 धावा केल्या.
SRH vs MI Live: ४ षटकात ४ विकेट
बोल्ट आणि चहरने त्यांच्या सुरूवातीच्या षटकांमध्ये मोठ्या ४ विकेट घेतल्या आहेत. चौथ्या षटकातील बोल्टच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला. तर चहरच्या पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नितीश रेड्डी स्वस्तात झेलबाद झाला. यासह पाच षटकांत हैदराबादने ४ बाद १५ धावा केल्या.
सामन्यातील तिसऱ्या षटकात दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशन झेलबाद झाला. पण मुख्य म्हणजे खेळाडूंनी अपीलही न करता पंचांनी हो नाही हो नाही म्हणत इशान किशनला झेलबाद दिलं. झेल टिपल्यानंतर रिकल्टनने झेलबाद झाल्याचं अपीलदेखील केलं नव्हतं, तरीही पंचांनी वाईड चेंडू देता देता आऊट दिलं. इशान किशनने तर चेंडू बॅटला लागला नसतानाही रिव्ह्यू न घेता मैदानाबाहेर गेला.
मुंबई इंडियन्सकडून दीपक चहरने गोलंदाजीला सुरूवात केली, त्याने हेड आणि अभिषेकला २ धावा दिल्या. तर दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर हेड झेलबाद झाला.
SRH vs MI Live: पहलगाम हल्ल्याचा निषेध
SRH vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर
SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा
SRH vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर
सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स सामन्याची नाणेफेक झाली असून मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघाचे खेळाडू हातावर काळीपट्टी बांधून उतरले आहेत.
SRH vs MI Live: मुंबई इंडियन्सवर नजर
हैदराबादविरुद्ध विजयाचा सिलसिला सुरू ठेवण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. यादरम्यान, संघा्ला सलग चौथा विजय मिळवायचा आहे. गेल्या सलग तीन सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे.
SRH vs MI Live: आयपीएल २०२५ गुणतालिका
आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ ८ पैकी ४ सामने जिंकत सहाव्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ पैकी २ सामने जिंकत नवव्या स्थानी आहे. मुंबईने या सामन्यात विजय मिळवला तर संघ टॉप-४ मध्ये प्रवेश करू शकतो.
SRH vs MI Live: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई-हैदराबाद सामन्यादरम्यान कोणते बदल होणार?
पहलगाममध्ये २२ एप्रिलला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला, या हल्ल्याचा देशभरात जाहीर निषेध करण्यात येत आहे. यानंतर आयपीएल २०२५ च्या सामन्यादरम्यान बीसीसीआयने काही बदल केले आहेत. खाली वाचा सविस्तर बातमी…
SRH vs MI Live: मुबंई इंडियन्सचा संपूर्ण संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर
SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.