Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Highlights: आयपीएल २०२३ च्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत २४ धावा करायच्या होत्या, पण आधी कॅमेरून ग्रीनने चार धावांचे षटक टाकले आणि त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला १४ धावांनी विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्जुनने मुंबईला विजय मिळवून दिला –

सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या चार धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनने २.५ षटकात १८धावा दिल्या. त्याला एक विकेट मिळाली.

Live Updates

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Highlights: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच हायलाइट्स

23:26 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक साधली

मुंबई संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने चांगली गोलंदाजी करत आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. मुंबईने हा सामना १४ धावांनी जिंकला आहे.

23:20 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादला शेवटच्या षटकात २०धावांची गरज आहे

सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात २०धावांची गरज आहे. अर्जुन तेंडुलकरने शेवटचे षटक टाकत आहे.

23:13 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: १६५ धावांवर आठवी विकेट पडली

हैदराबादला १८ व्या षटकात १९ धावा मिळाल्या, ज्यात एका वाइडसह चौकाराचाही समावेश होता. मात्र त्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरही धावबाद झाला. आता हैदराबादला १२ चेंडूत २४ धावांची गरज आहे. अब्दुल समद यांच्यावर सर्वांच्या आशा असतील.

23:05 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादला सातवा धक्का

हैदराबादने १४९ धावांवर सातवी विकेट गमावली. मार्को जॅनसेनही दोन चौकार मारून बाद झाला. आता अब्दुल समद आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर आहेत.. हैदराबादला विजयासाठी १५ चेंडूत ४७ धावांची गरज आहे.

22:59 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: १५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ६ बाद १३३

मयंक अग्रवाल आणि हेन्रिक क्लासेन खेळत असताना हैदराबाद हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र दोघेही बाद झाल्याने सामना पुन्हा मुंबईच्या ताब्यात आला. १५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ६ बाद १३३ आहे. १६ चेंडूत ३६ धावा करून क्लासेन बाद झाला आणि मयंकने ४१ चेंडूत ४८धावा केल्या.

22:54 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मयंक अग्रवालचे अर्धशतक हुकले

मयंक अग्रवालच्या रूपाने सनरायझर्स हैदराबादला सहावा धक्का बसला. मयंकने ४८ धावांवर आपली विकेट गमावली. रिले मेरेडिथने मयंक अग्रवालची विकेट घेतली. हैदराबादला आता विजयासाठी २९ चेंडूत ५९ धावांची गरज आहे.

22:46 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

पियुष चावलाने १४ व्या षटकात हेनरिक क्लासेनला बाद केले. क्लासेनने या षटकात आउट होण्यापूर्वी २ चौकार आणि २ षटकार मारत २१ धावा केल्या. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही क्लासेनने मोठा फटका मारला आणि त्याची विकेट गमावली.

22:40 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: १२ षटकानंतर हैदराबादची धावसंख्या ४ बाद ९६

मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेन यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन केले आहे. १२ षटकांनंतर आता संघाची धावसंख्या ९६ झाली आहे. मयंक अग्रवाल ४४ आणि क्लासेन १० धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये २० चेंडूत ३१ धावांची भागीदारी झाली आहे.

22:31 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या १० षटकांत ४ बाद ७६

सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या १० षटकांत ४ बाद ७६ अशी आहे. ओडन मार्कराम ९व्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर १०व्या षटकात अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. आता मयंक अग्रवाल आणि हेन्रिक क्लासेन क्रीजवर आहेत.

22:27 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबाद अडचणीत, एडन मार्करामनंतर अभिषेक शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला

सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या १० षटकांत ४ बाद ७६ अशी आहे. एडन मार्कराम (२२) ९व्या षटकात बाद झाला. त्यानंतर १०व्या षटकात अभिषेक शर्मा (१) पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रथम ग्रीनला यश मिळाले आणि नंतर चावलाची विकेट मिळाली. आता मयंक अग्रवाल आणि हेन्रिक क्लासेन क्रीजवर आहेत.

22:23 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादने ९ षटकांत ३ गडी गमावून ७२ धावा केल्या

१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने ९ षटकांत ३ गडी गमावून ७२ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल (२८) आणि अभिषेक शर्मा (१) धावा करून खेळत आहेत. कर्णधार मार्कराम १७ चेंडूत २२ धावा करुन बाद झाला.

22:14 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबाद संघाने ८ षटकांत दोन बाद ६४ धावा केल्या

सनरायझर्स हैदराबाद संघाने ८ षटकानंतर २ गडी गमावून ६४ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल २८ आणि एडन मार्कराम १७ धावांवर खेळत आहे. संघाला विजयासाठी अद्याप ७२ चेंडूत १२९धावा करायच्या आहेत.

22:08 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: पावरप्लेच्या समाप्तीनंतर हैदराबादची धावसंख्या २ बाद ४५

६ षटकं संपल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने २ गडी गमावून ४५ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल १९ आणि एडन मार्कराम ४ धावांवर खेळत आहे.

21:51 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादची खराब सुरुवात, दुसरा धक्का

सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतक झळकावणारा हॅरी ब्रूक बाद झालाे. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी फार काही मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्याने ५ चेंडूत ७ धावा केल्या. जेसन बेहरेनडॉर्फने ही दुसरी विकेट घेतली.

सनरायझर्स हैदराबाद २५-२

21:38 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादला पहिला धक्का, हॅरी ब्रूक बाद

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. हॅरी ब्रूक ७ चेंडूत ९ धावा करत जेसन बेहरेनडॉर्फकरवी बाद झाला.

सनरायझर्स हैदराबाद ११-१

21:17 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: कॅमेरुन ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हैदराबादला १९३ धावांचे लक्ष्य दिले

हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या आयपीएल २०२३ च्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम खेळताना २० षटकांत ४गडी गमावून १९२ धावा केल्या. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादसमोर आता १९३ धावांचे आव्हान आहे. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. त्याचवेळी तिलक वर्माने १७ चेंडूत ३७ धावा, इशान किशनने ३१ चेंडूत ३८धावा आणि रोहित शर्माने १८ चेंडूत २८ धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले.

21:07 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: कॅमेरुन ग्रीनचे अर्धशतक

मुंबईने १८ षटकांत ४ गडी गमावून १७२ धावा केल्या आहेत. कॅमेरुन ग्रीनने अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ५८ धावा केल्यानंतर तो नाबाद आहे.

21:03 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: तिलक वर्मा ठरला भुवनेश्वरचा बळी

१७ व्या षटकात स्फोटक फलंदाज तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. आधी त्याने भुवनेश्वर कुमारला षटकार ठोकला आणि मग भुवीने त्याला तंबूत पाठवले. तिलकने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ४ षटकार निघाले.

20:59 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबईला चौथा धक्का

तिलक वर्मा ३७ धावांची स्फोटक खेळी करून बाद झाला. त्यामुळे मुंबईला चौथा धक्का बसला आहे.

20:54 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: तिलक वर्माने सांभाळला मुंबईचा मोर्चा

एका षटकात दोन गडी बाद झाल्याने मुंबई संकटात सापडली होती, पण कॅमेरून ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा तंबूत आणले आहे. दोघांमध्ये २५ चेंडूत ४९ धावांची भागीदारी झाली आहे. १६ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद १४४ आहे. ग्रीन ३९ आणि तिलक ३१ धावांवर खेळत आहेत.

20:46 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: १५ षटकानंतर मुंबई इंडियन्स ३ बाद १२४

१५ षटकानंतर मुंबई इंडियन्स संघाने ३ बाद १२४ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर तिलक वर्मा (१९) आणि कॅमेरुन ग्रीन (३७) खेळत आहे.

20:38 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: १०० च्या आत मुंबईने आपले ३ फलंदाज गमावले

इशान किशनची विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. मात्र तो येताच पॅव्हेलियनमध्ये परतला. १०० च्या आत मुंबईने आपले ३ फलंदाज गमावले आहेत.

20:34 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: जॅनसेनने एका षटकात दोन बळी घेतले, इशानपाठोपाठ सूर्यकुमारलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले

मार्को जॅनसेनने एका षटकात मुंबईला दोन धक्के दिले. जानसेनने इशान किशनला आधी ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने येऊन षटकार मारला. यानंतर सूर्यकुमारही बाद झाला. विशेष म्हणजे दोघांनाही एडन मार्करामने झेलबाद केले.

20:30 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का

मुंबई इंडियन्सला आणखी धक्का बसला आहे.इशान किशन ३८ धावांवर दुसऱ्या विकेटच्या रुपाने बाद झाला. आता फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव आला आहे.

20:20 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सने १० षटकांत १ गडी गमावून ८० धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १० षटकांत १ गडी गमावून ८० धावा केल्या आहेत. इशान किशन (३४) आणि कॅमेरून ग्रीन (१६) धावा करून खेळत आहेत.

20:12 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आठ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एका विकेटवर ६० धावा

८ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एका विकेटवर ६० धावा आहे. इशान किशन २४ आणि कॅमेरून ग्रीन सात धावांवर खेळत आहेत. दोघेही फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत.

20:04 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सची धावसंख्या १ बाद ५३

पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली आहे. ६ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ५३ अशी आहे. इशान किशन १४ चेंडूत २१ आणि कॅमेरून ग्रीन चार चेंडूत ३ धावा खेळत आहे. इशानने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.

19:58 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का; रोहित शर्माला २८ धावांवर बाद

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का पाचव्या षटकात ४१ धावांवर बसला. रोहित शर्मा १८ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याला टी नटराजनने झेलबाद केले. कॅमेरून ग्रीन आज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

19:49 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: रोहित शर्माने ६ हजार धावा पूर्ण केल्या

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादविरुद्ध केवळ दमदार सुरुवातच केली नाही तर आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण करणारा तो चौथा फलंदाज ठरला.

19:42 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या

दोन षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एकही विकेट न पडता 15 धावा आहे. मार्को जॅनसेनच्या या षटकात एकूण 9 धावा आल्या. या षटकातील शेवटच्या चेंडूवर ईशान किशनने षटकार ठोकला.

आयपीएल २०२३ च्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला.