Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Highlights: आयपीएल २०२३ च्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत २४ धावा करायच्या होत्या, पण आधी कॅमेरून ग्रीनने चार धावांचे षटक टाकले आणि त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला १४ धावांनी विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्जुनने मुंबईला विजय मिळवून दिला –

सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या चार धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनने २.५ षटकात १८धावा दिल्या. त्याला एक विकेट मिळाली.

Live Updates

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Highlights: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच हायलाइट्स

19:38 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: रोहित आणि ईशानने डावाची सुरुवात केली

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात रोहितच्या चौकारासह धावसंख्या ६/० आहे.

19:26 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: दोन्ही संघाचे इम्पॅक्ट प्लेयर

दोन्ही संघांसाठी इम्पॅक्ट प्लेयरचे पर्याय:

मुंबई इंडियन्स : रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, विष्णू विनोद

सनरायझर्स हैदराबाद : अब्दुल समद, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, उमरान मलिक</p>

19:17 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, रितिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

19:16 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेन्रिक क्लॉसेन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

19:11 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई संघ प्रथम फलंदाजी करेल

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने संघात एकही बदल केला नाही. मुंबईने दुआने यानसेनच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फचा समावेश केला आहे.

19:03 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: नाणेफेक जिंकून हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

नाणेफेक जिंकून हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

18:51 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान, काही वेळात टॉस होणार

आयपीएलच्या २५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. गेल्या दोन सामन्यात सनरायझर्स आणि मुंबई संघाने विजय मिळवला आहे. दोघांच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे असतील. पॉइंट टेबलमध्ये मुंबई आठव्या तर सनरायझर्स नवव्या स्थानावर आहे.

18:45 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: दोन्ही संघ विजयी रथावर स्वार

दोन्ही संघ सलग विजयांची नोंद करून येथे पोहोचले असून विजयाच्या हॅट्ट्रिककडे लक्ष असेल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आतापर्यंत ४-४ सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. कोलकाताचा पराभव करून दोन्ही संघ येथे पोहोचले आहेत. गेल्या सामन्यात हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर २३ धावांनी तर मुंबई इंडियन्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता.

18:42 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: रोहित शर्मा विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर

एमआयचा कर्णधार रोहित शर्माचा एसआरएचचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. वॉशिंग्टनने रोहितविरुद्ध २६ चेंडू टाकले असून केवळ २५ धावा केल्या आहेत. त्याने हिटमॅनला तीनदा बाद केले आहे.

18:33 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. विराट कोहली – ६८४४ धावा

२. शिखर धवन – ६४७७ धावा

३. डेव्हिड वॉर्नर – ६१०९ धावा

४. रोहित शर्मा – ५९८६ धावा

५. सुरेश रैना – ५५२८ धावा

18:32 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: रोहित शर्मा फक्त १४ धावा करताच विराट-शिखरच्या खास क्लबमध्ये होणार सामील

रोहित शर्मा ६००० धावांपासून १४ धावा दूर –

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी ६००० धावा केल्या आहेत. या यादीत आरसीबीचा विराट कोहली, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन यांचा समावेश आहे. रोहित या पराक्रमाच्या अगदी जवळ आहे. त्याने २३१ सामन्यात ५९८६ धावा केल्या आहेत. मंगळवारी त्याने १४ धावा केल्या तर त्याच्या सहा हजार धावाही पूर्ण होतील.

18:27 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आयपीएल २०२३ मध्ये प्रथम दोन जुळे भाऊ एकमेकांच्या संघाविरुद्ध खेळताना दिसणार

केकेआरविरुद्ध मुंबईने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मार्को जेन्सनचा जुळा भाऊ डुआन जेन्सन यांना संधी दिली होती. आजच्या सामन्यात जर डुआनला संधी दिली गेली, तर आयपीएलमध्ये दोन जुळे भाऊ एकमेकांच्या संघाविरुद्ध खेळताना प्रथमच दिसतील.

18:17 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबाद संघात एकापेक्षा एक गोलंदाजांचा भरणा

लेगस्पिनर मयंक मार्कंडेय गोलंदाजीत हैदराबादसाठी चांगली भूमिका बजावत आहे. त्याने आतापर्यंत सहा विकेट्स घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद हेही त्यांच्यासोबत आहेत. वेगवान गोलंदाजीतही हैदराबादकडे उमरान मलिक, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि मार्को जेन्सनसारखे पर्याय आहेत. उमरानला अद्याप गेल्या मोसमातील कामगिरीची बरोबरी करता आलेली नाही.

18:14 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सची फलंदाजी हीच ताकद

मुंबईसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सूर्यकुमारचा फॉर्म होता, पण केकेआरविरुद्ध त्याने २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४३ धावा केल्या. इशाननेही २५ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळली. तिलक वर्मा आधीच फॉर्मात असून गेल्या सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळणाऱ्या रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध अर्धशतक झळकावले. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांनीही फलंदाजीत योगदान दिले आहे. अशा स्थितीत मुंबईची फलंदाजी पूर्ण रंगात दिसत आहे, जी हैदराबादसाठी आपल्याच घरात धोक्याचे कारण ठरू शकते.

18:01 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: दोन्ही संघात काट्याची टक्कर

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत १९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी सनरायझर्सने ९ सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये मुंबईने १० सामने जिंकले आहेत. यामध्ये एक सामना मुंबईने सुपर ओव्हरमध्ये जिंकलेला आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २०२२ मध्ये झाला होता. या सामन्यात हैदराबाद संघाने चमकदार कामगिरी करताना ३ धावांनी विजय मिळवला होता.

17:51 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आज हैदराबादचे हवामान कसे असेल?

इथल्या हवामानाबद्दल बोलायचं तर चाहत्यांना आणि संघांसाठी दिलासा देणारा आहे की पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे पूर्ण २०-२० षटकांच्या सामन्याचा आनंद घेता येईल. दिवस सूर्यप्रकाशित पण अंशतः ढगाळ असेल. जरी यामुळे उष्णता कमी होणार नाही. त्याच वेळी भरपूर आर्द्रता असेल. ज्यामुळे दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला नंतर त्रास होऊ शकतो. तपमानाबद्दल बोलायचे झाले तर आज हैदराबादमध्ये कमाल तापमान ३९ अंश सेंटीग्रेडपर्यंत तर किमान तापमान २६ अंश सेंटीग्रेडपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

17:46 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल

यंदाच्या मोसमात आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांवर नजर टाकली तर फलंदाजांना येथे चांगलाच फायदा होणार आहे. येथे खेळल्या गेलेल्या या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजांना सामन्याच्या एकाही डावात संपूर्ण संघाला वेसण घालता आली नाही. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ५ गडी गमावून २०३ धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ ८ विकेट्सवर केवळ १३१ धावाच करू शकला.

दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने ९ बाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान सनरायझर्स हैदराबादने २ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि घरच्या मैदानावर मोसमातील पहिला विजय नोंदवला. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट फलंदाज आहेत, विशेषत: मुंबई इंडियन्स. अशा स्थितीत धावांचा पाऊस नक्कीच पडेल, विशेषत: जो संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरेल, त्यानंतर आणखी संधी असतील.

17:37 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, ड्वेन जॅन्सेन/जोफ्रा आर्चर, हृतिक शोकीन, पियुष चावला, रिले मेरेडिथ.

17:36 (IST) 18 Apr 2023
MI vs SRH: आजच्या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद : हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

आयपीएल २०२३ च्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला.