IPL 2024, CSK vs GT Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२४ मधील पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोसमातील सलामीच्या लढतीत दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१३ नंतर मुंबई इंडियन्सला या मोसमातील पहिला सामना जिंकता आलेला नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या सामन्यात जसप्रीत बुमराहची चमकदार गोलंदाजी, डेवाल्ड ब्रेव्हिसची दमदार खेळी आणि रोहित शर्माच्या ४६ धावांची खेळी या त्यांच्यासाठी सकारात्मक बाजू होत्या.

SRH vs MI: पिच रिपोर्ट

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL 2024 चा आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. येथील खेळपट्टी सपाट मानली जाते आणि त्यामुळे इथे बरेच चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. पण जसजसा सामना पुढे सरकतो तसतसे फिरकीपटू सामन्यात आपली चमक दाखवतात. आणखी एक गोष्ट म्हणजे या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक यश मिळते.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे ७१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ३१ सामने जिंकले असून दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ४० सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी करणे पसंत करेल.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादला धावांवर अंकुश ठेवता आला नाही. संघातील गोलंदाजांनी सहज धावा दिल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन हा खूपच महागडा ठरला. ज्याने ३ षटकांत ४० धावा दिल्या. तर अखेरच्या षटकात फॉर्मात असलेल्या रसेल इतर गोलंदाजांना चोपले. SRH या सामन्यात फझलहक फारुकीला उतरवू शकते, जो चेंडू दोन्ही बाजूने फिरवण्यात माहिर आहे. संघाच्या संयोजनाशी छेडछाड न करता हा एक योग्य बदल असेल. फारुकीला गेल्या काही महिन्यांत एकदिवसीय विश्वचषक तसेच जानेवारीमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान या परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे.

ल्यूक वुडने प्रति षटक १२ पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या आणि त्याला गुजरातविरुद्ध फक्त दोन षटके टाकण्याची संधी मिळाली. आजच्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी आणि कर्णधार हार्दिक पंड्या हे तीन आघाडीचे वेगवान खेळाडू आहेत. तर मुंबईकडे अतिरिक्त फिरकी गोलंदाजीचा पर्याय म्हणून मोहम्मद नबीची निवड करू शकते. तर फलंदाजीमध्ये नमन धीरने पहिल्याच सामन्याच वादळी खेळी करत आपली जागा प्लेईंग इलेव्हनमध्ये निश्चित केली आहे.

SRH vs MI: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी

इम्पॅ्क्ट खेळाडू: डेवाल्ड ब्रेव्हिस, रोमॅरियो शेफर्ड, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड

सनरायझर्स हैदराबाद
मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद,शाहबाज अहमद, फजलहक फारुकी, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन

इम्पॅ्क्ट खेळाडू: जयदेव उनाडकट, आकाश सिंग, ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर

Story img Loader