Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Updates: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु संघात खेळला गेला आहे. या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनने झंझावाती शतकाच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या १९.२ षटकात १८७ धावा करत विजय नोंदवला.

आरसीबीने दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल ४ मध्ये प्रवेश केला आहे. त्यानी आतापर्यंत १३सामने खेळले असून या कालावधीत त्याने ७सामने जिंकले आहेत. बेंगळुरूला ६सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचे १४ गुण झाले आहेत.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
Asian Champions Trophy 2024 IND vs JAP India Hocket Team beat Japan by 5 1 Score
Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर भारताच्या हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू, चीननंतर जपानचा ५-१ च्या फरकाने पराभव
DPL 2024 Final East Delhi Champion
DPL 2024 Final : ईस्ट दिल्ली रायडर्सने पटकावले पहिले जेतेपद, मयंक रावत ठरला विजयाचा शिल्पकार
fritz sinner advance to final in 2024 us open
सिन्नेरचा अंतिम फेरीत प्रवेश ; उपांत्य लढतीत ड्रॅपरवर मात; अमेरिकेच्या फ्रिट्झचे आव्हान

कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर बंगळुरूचा विजय –

विराट कोहलीने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कोहलीने ६३ चेंडूत १०० धावांची खेळी केली. त्याने १२ चौकार आणि चार षटकार मारले. त्याचे आयपीएलमधील हे सहावे शतक आहे. त्याने ख्रिस गेलच्या शतकांच्या विक्रमांशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसिस सोबत पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी रचली. फाफ डू प्लेसिसनेही ४७ चेंडूत ७१ धावांचे योगदान दिले. प्लेसिसने ७ चौकार आणि २ षटकार मारले. अखेरीस ग्लेन मॅक्सवेल ५ धावा आणि ब्रेसवेल ४धावा करून नाबाद राहिला.

हैदराबादच्या डावात क्लासेनचे धमाकेदार शतक –

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना क्लासेनने हैदराबादसाठी स्फोटक शतक झळकावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ५१ चेंडूत १०४ धावा केल्या. क्लासेनच्या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २०३.९२ होता. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा क्लासेन हैदराबादचा चौथा खेळाडू ठरला.

तत्पूर्वी, अभिषेक त्रिपाठी ११धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रेसवेलने त्याला चालायला लावले. सलामीवीर राहुल त्रिपाठी १२ चेंडूत १५धावा करून बाद झाला. ब्रेसवेलने त्रिपाठीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कर्णधार आदिन मार्कराम २० चेंडूत १८ धावा करून बाद झाला. अखेरीस, हॅरी ब्रूक २७धावा करून नाबाद राहिला. त्याने १९ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकार ठोकला. ग्लेन फिलिप्स ५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Gujarat Titans: हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशाच्या संघांत रंगला सामना; नाणेफेकीचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

सिराज-ब्रेसवेलने गोलंदाजीत कमाल दाखवली –

आरसीबीसाठी सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ १७ धावा देत एक विकेट घेतली. ब्रेसवेलने २ षटकात १३ धावा देत २ बळी घेतले. शाहबाज अहमदने ३ षटकात ३८ धावा देत १ बळी घेतला. हर्षल पटेलने ४ षटकात ३७ धावा देत १ बळी घेतला. कर्ण शर्मा आणि पारनेल यांना एकही विकेट मिळाली नाही.