Rajat Patidar’s 4 Consecutive Sixes Video : सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात २०६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या सामन्यात रजत पाटीदारच्या बॅटने शानदार खेळी पाहायला मिळाली. रजत पाटीदारने या खेळीत एका षटकात सलग चार षटकार मारत, एक असा पराक्रम केला जो गेल्या ११ वर्षांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एकाही फलंदाजाने केला नव्हता.

११व्या षटकात मारले सलग चार षटकार –

११व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराट कोहलीकडून स्ट्राईक घेऊन आलेल्या रजतसमोर मयंकने दुसरा चेंडू वाईड टाकला. हा चेंडू पुन्हा टाकल्यावर रजतने लाँग ऑफच्या दिशेने ८६ मीटरचा शक्तिशाली षटकार मारला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर पुन्हा एकदा शानदार षटकार ठोकला. त्यानंतर पाटीदारचे वादळ टाळण्यासाठी मयंकने गुगलीचा प्रयत्न केला, पण रजतने तो चेंडू पण डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. मयंकने पाचवा चेंडू ऑफ स्टंपपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू वाईड गेला असता, पण रजतने त्याच्या लेन्थला जाऊन एक्स्ट्रा कव्हरवर शानदार षटकार ठोकला. रजतने चार चेंडूत सलग ४ षटकार मारत हैदराबाद स्टेडियममध्ये खळबळ उडवून दिली.

Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

रजत पाटीदारने खेळली ऐतिहासिक खेळी –

रजत पाटीदारने या सामन्यात २५० च्या स्ट्राईक रेटने २० चेंडूत ५० धावा केल्या. या दरम्यान पाटीदारने २ चौकार आणि ५ षटकार मारले. रजत पाटीदारने ५० धावांचा टप्पा गाठण्यासाठी १९ चेंडू घेतले. आरसीबीसाठी हे संयुक्त दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी, आरसीबी संघासाठी ११ वर्षांनंतर प्रथमच एका फलंदाजाने अर्धशतक करण्यासाठी २० पेक्षा कमी चेंडूंचा सामना केला आहे. याआधी २०१३ मध्ये ख्रिस गेलने १७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

हेही वाचा – IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?

आरसीबीसाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

१७ चेंडू – ख्रिस गेल
१९ चेंडू – रजत पाटीदार
१९ चेंडू – रॉबिन उथप्पा

विराट कोहलीने केले दोन विक्रम –

या सामन्यात रजत पाटीदारशिवाय विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले. विराटने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर विराटने या मोसमात आपल्या ४० धावाही पूर्ण केल्या. १० वेगवेगळ्या हंगामात ४०० हून अधिक धावा करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर त्याने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ४ हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा सलामीवीर ठरला आहे.

हेही वाचा – Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

जयदेव उनाडकटची १०० व्या सामन्यात संस्मरणीय कामगिरी –

जयदेव उनाडकटचा हा १०० वा सामना होता. या विशेष सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. जयदेव उनाडकटने ४ षटकात ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच विराट कोहलीलाही त्याने बाद केले. त्याचवेळी जयदेव उनाडकटने रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोर यांनाही बाद केले.