Trent Boult breaks Sandeep Sharma’s record : आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून हैदराबादविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजूचा निर्णय त्याच्या संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने योग्य असल्याचे सिद्ध केले, ज्याने पॉवरप्लेमध्ये तीन विरोधी फलंदाजांना बाद केले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने झटपट ३ विकेट्स गमावल्या. या पहिल्या तिन्ही विकेट्स राजस्थान रॉयल्ससाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने घेतल्या. या ३ विकेट्सच्या आधारे बोल्ट आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने त्याचा सहकारी संदीप शर्माला मागे टाकले.
ट्रेंट बोल्टने संदीप शर्माचा विक्रम मोडला –
राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजी करायला येताच ट्रेंट बोल्टने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिले ३-४ चेंडू त्याच्यासाठी वाईट होते. यानंतर हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात ट्रेंट बोल्टने पॉवरप्ले दरम्यान ३ षटके टाकली आणि ३२ धावांत ३ विकेट्स घेतले. त्याने अभिषेक शर्माला १२ धावांवर, राहुल त्रिपाठीला ३७ धावांवर आणि एडन मार्करामला एका धावेवर बाद केले. या ३ विकेट्सच्या आधारे बोल्ट आता आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला असून संदीप शर्मा तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. पॉवरप्लेमध्ये बोल्टच्या नावावर आता ६२ विकेट्स आहेत तर संदीपच्या नावावर ५९ विकेट्स आहेत.
आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स :
७१ – भुवनेश्वर कुमार
६२ – ट्रेंट बोल्ट
५९ – संदीप शर्मा
५८ – दीपक चहर<br>५८ – उमेश यादव<br>५७ – इशांत शर्मा</p>
हेही वाचा – IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…
हैदराबादची अवस्था केकेआरविरुद्धही अशीच होती –
पहिल्या क्वालिफायर सामन्यातही केकेआरविरुद्ध सनरायझर्स हैदराबादची स्थिती अशीच होती. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सच्या या निर्णयावर स्टार्कने पहिला हल्ला चढवला. मिचेल स्टार्कने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट घेत सनरायझर्स हैदराबादला हादरवले. पॉवरप्लेनंतर हैदराबादची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावा होती. मात्र, राजस्थानविरुद्ध हैदराबादची धावसंख्या ६८ धावांत ३ विकेट्स अशी राहिली.
ट्रेंट बोल्टने टी-२० पॉवरप्लेमध्ये १०० विकेट्स केल्या पूर्ण –
ट्रेंट बोल्टने टी-२० फॉरमॅटच्या पॉवप्लेमध्ये ३ विकेट घेऊन १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाजही ठरला. याआधी डेव्हिड विली आणि भुवनेश्वर कुमार यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ही कामगिरी केली आहे. टी-२० पॉवरप्लेमध्ये डेव्हिड विलीच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत, तर भुवी दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – ‘जर मी त्याच्या जागी असते तर हार मानली असती’, पत्नी दीपिकाची कार्तिकबद्दल प्रतिक्रिया, विराट काय म्हणाला?
टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज :
१२८ – डेव्हिड विली
११८ – भुवनेश्वर कुमार
१०१ – ट्रेंट बोल्ट