कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
संघासोबतचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. आम्ही एकजुटीने उभे राहिलो आणि आव्हानांना समोरे गेलो. संघातील प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आणि योजना अंमलात आणल्या. यातच मुंबईच्या यशाचे गमक असल्याचे सचिन म्हणाला. रोहित आणि सिमन्सने संघाला चांगली सुरूवात करून दिल्याचा फायदा झाल्यानेच भक्कम आव्हान उभारता आल्याचे सचिन एका मुलाखतीत म्हणाला. आयपीएलमध्ये कमबॅक करण्याची शक्यता यावेळी सचिनने फेटाळून लावली मात्र, काही संकल्पना पुढे आल्या आहेत. त्यावर विचार सुरू असल्याचे सांगत सचिनने फिरकीपटू शेन वॉर्नसोबत माजी खेळाडूंच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगचे आयोजनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Story img Loader