CSK Head Coach Stephen Fleming Press Conference, IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने आयपीएल २०२३ च्या फायनल सामन्याआधी या हंगामाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. फ्लेमिंगने आयपीएलचा १६ वा हंगाम आतापर्यंतचा सर्वात कठीण हंगाम असल्याचं म्हटलं आहे. फ्लेमिंगच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या आयपीएलचा वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक होता, कारण प्रत्येक संघाने मैदानात उतरून अप्रतिम कामगिरी केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लेमिंग माध्यमांशी बोलताना म्हणाला, “संघ आता खूप जास्त स्मार्ट झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरंवायचं, याबद्दल त्यांना खूप चांगलं माहित आहे. हा वर्ष वेगळा राहिला नाही. हा सर्वात कठीण सीजन राहिला आहे. प्रत्येक संघाविरोधात एक वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं. जेव्हा आमचा सीजन खराब जातो, त्यानंतर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतो, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.”

नक्की वाचा – CSK vs GT : गुरु-शिष्य एकमेकांना भिडणार, पण गुजरातच्या ‘या’ पाच खेळाडूंसमोर धोनीची रणनिती ठरणार फोल?

दरम्यान, आयपीएल २०२३ चा फायनल सामना चारवेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केल्याने फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता त्यांच्या लक्ष आयपीएलमध्ये पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे असेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून फायनलमध्ये जागा पक्की केली. गुजरात सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न करेल. दोन्ही संघ या हंगामातील सर्वात बेस्ट संघ आहेत. अशातच एका रंगदात सामन्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stephen fleming said in the press conference that ipl 2023 has been the toughest season csk vs gt ipl 2023 nss