Sunil Gavaskar criticizes Hardik Pandya : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २९वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स याच्यात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०६ धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात एमआय संघ ६ बाद १८६ धावाच करु शकला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या निशाण्यावर आहे. अशात आता माजी खेळाडू सुनील गावसकर आणि केविन पीटरसनने हार्दिक पंड्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावसकर म्हणाले, हार्दिक हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून अगदी साधारण आहे, तर त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजी कौशल्यातही कमतरता आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने केलेल्या सर्व चुका अधोरेखित करताना महान सुनील गावसकर यांनी या गोष्टी सांगताच इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनही त्यात सामील झाला. त्यानी हार्दिकच्या फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्याच्या कर्णधारपदाच्या निर्णयातील उणिवा अधोरेखित केल्या.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली. गावसकर म्हणाले की, “मी खूप दिवसांनी इतकी वाईट गोलंदाजी पाहिली आहे. हार्दिकला या वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव होती की त्याच्याकडे अशी गोलंदाजी आहे, ज्यावर धोनी सहज षटकार मारू शकतो, तरीही तुम्ही त्याला त्या लेन्थवर गोलंदाजी करत आहात ज्यावर कोणत्याही फलंदाजाने अशा परिस्थितीत चेंडू चाहत्यांपर्यंत पोहोचवला असता. हार्दिकची गोलंदाजी अतिशय साधारण होती. त्याचबरोबर या सामन्यात त्याची कर्णधार म्हणून पण कामगिरी अत्यंत खराब होती.”

हेही वाचा – MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO

केविन पीटरसननेही हार्दिकला फटकारले –

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही प्लॅन ए अयशस्वी झाल्यावर प्लॅन बी न स्वीकारल्याबद्दल हार्दिक पांड्याला फटकारले. सीएसकेचे फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज धावा करत असताना हार्दिक पंड्याने आपल्या फिरकीपटूंचा वापर का केला नाही, असा प्रश्न केविन पीटरसनला पडला. केविन पीटरसन म्हणाला, “मी पाच तास आधी झालेल्या टीम मीटिंगमध्ये प्लॅन ए असलेला कर्णधार पाहिला, पण जेव्हा प्लॅन ए काम करत नव्हता तेव्हा त्याने प्लॅन बीकडे वळायला हवे होते. परंतु त्याने प्लॅन बी का वापुरला नाही?”

हेही वाचा – IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा

हार्दिकवर टीकेचा परिणाम –

या अष्टपैलू खेळाडूला बाहेरच्या टीकेचा फटका बसत असल्याचे केविन पीटरसनचे मत आहे. तो म्हणाला, “मला खरोखर वाटते की खेळाबाहेरील गोष्टींचा हार्दिक पंड्यावर खूप प्रभाव पडत आहे. जेव्हा तो टॉसला जातो, तेव्हा तो खूप हसत असतो. तो खूप आनंदी असल्यासारखे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण तो आनंदी नाही. हे माझ्या बाबतीतही घडले आहे. मी याचा सामना केला आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की त्याचा तुमच्यावर परिणाम होतो.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar and kevin pietersen criticize mi skipper hardik pandyas performance after defeat against csk in ipl 2024 vbm