वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषक २०२४ मधून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याच्या आवाहनावर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात २०२२ च्या टी२० विश्वचषकातील भारताच्या अपयशानंतर, शर्मा आणि कोहली या दोघांनाही टी२० संघातून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या.

मात्र, कोहली गेल्या काही महिन्यांपासून टी२० क्रिकेटमध्ये असाधारण फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२३ मध्ये, कोहलीने सलग शतके ठोकून ख्रिस गेलचा सर्वाधिक आयपीएल शतकांचा विक्रम मागे टाकला. गावसकर यांनी स्पोर्ट्स तकवर या विषयावरील चर्चेत २०२४ मध्ये आयसीसी स्पर्धेत कोहलीच्या समावेशाच्या विषयावर भाष्य केले आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
India Avoid the Follow on With Bumrah Akashdeep and KL Rahul Ravindra Jadeja Partnership in IND vs AUS Gabba Test
IND vs AUS: भारताचा फॉलोऑन टळला! बुमराह-आकाशदीपच्या जोडीने जीवाची लावली बाजी, जडेजा-राहुलने रचला होता पाया
Sunil Gavaskar says Virat Kohli should take inspiration from Sachin Tendulkar sports news
कोहलीने सचिनकडून प्रेरणा घ्यावी -गावस्कर
Mohammed Siraj Marnus Labuschagne Bail Switch Helps Team India to Take 3rd Wicket in Gabba Video Viral IND vs AUS
IND vs AUS: सिराजची युक्ती अन् नितीश रेड्डीने मिळवून दिली विकेट, लबुशेनला बेल्सची परत अदलाबदली करणं पडलं महागात; VIDEO व्हायरल

हेही वाचा: IPL 2023: माहीच्या कॅप्टन्सीने ‘दादा’चे जिंकले मन, CSK च्या यशाबद्दल सौरव गांगुली म्हणाला,” एम.एस. असा खेळाडू आहे की…”

गावसकर म्हणतात, “पुढील टी२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळवला जाईल. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये आणखी एक आयपीएल होणार आहे. त्यावेळी कोहलीचा फॉर्म पाहिला पाहिजे. आता त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. जर आपण आगामी टी२० बद्दल बोलत असू तर आंतरराष्‍ट्रीय सामने पाहता, भारत जूनमध्‍ये एक सामना खेळत आहे, मग तो निश्चितपणे संघात बसतो, ज्या प्रकारचा फॉर्म त्याने दाखवला आहे. पण, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार्‍या २०२४ च्या विश्वचषकाबद्दल बोलताना, त्याआधी आयपीएलमध्ये खेळाडूंचा फॉर्म पाहणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण विश्वचषक संघासाठी निवड करण्याबद्दल बोलू शकतो.”

तीन वर्षे फॉर्मात राहिल्यानंतर कोहलीने २०२२ पासून खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये आणि आयपीएलमध्ये  पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या. १३९.८२ चा स्ट्राइक रेटने दोन शतके आणि सहा अर्धशतके देखील झळकवली आहेत.

हेही वाचा: IND vs AFG: टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्यावर; आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना मिळणार संधी

कोहलीच्या सध्याच्या फॉर्मचे मूल्यांकन करताना, गावसकर यांनी पुनरुच्चार केला की, “३४ वर्षीय खेळाडू आगामी सामन्यांसाठी भारताच्या टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र आहे.” ते पुढे म्हणतात, “भारताच्या आगामी सामन्यांसाठी सध्याच्या फॉर्मेटमध्ये विराट माझ्या टी२० संघात नक्कीच असेल. त्याने [IPL 2023 मध्ये] दोन शतके झळकावली आहेत. टी२० क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकणेच काय , अगदी ५० धावा करणे देखील कठीण आहे. या महान फलंदाजाने दोन शतके ठोकली आहेत. जर मी निवडकर्ता असतो आणि भारत या वर्षी जूनमध्ये टी२० खेळत असतो, तर मी निःसंशयपणे त्याला संघात घेईन.” जुलै-ऑगस्टमध्ये भारताला कॅरिबियन भूमीवर वेस्ट इंडिजविरुद्ध ५ टी२० सामने खेळण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader