वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषक २०२४ मधून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याच्या आवाहनावर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात २०२२ च्या टी२० विश्वचषकातील भारताच्या अपयशानंतर, शर्मा आणि कोहली या दोघांनाही टी२० संघातून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मात्र, कोहली गेल्या काही महिन्यांपासून टी२० क्रिकेटमध्ये असाधारण फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२३ मध्ये, कोहलीने सलग शतके ठोकून ख्रिस गेलचा सर्वाधिक आयपीएल शतकांचा विक्रम मागे टाकला. गावसकर यांनी स्पोर्ट्स तकवर या विषयावरील चर्चेत २०२४ मध्ये आयसीसी स्पर्धेत कोहलीच्या समावेशाच्या विषयावर भाष्य केले आहे.
गावसकर म्हणतात, “पुढील टी२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळवला जाईल. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये आणखी एक आयपीएल होणार आहे. त्यावेळी कोहलीचा फॉर्म पाहिला पाहिजे. आता त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. जर आपण आगामी टी२० बद्दल बोलत असू तर आंतरराष्ट्रीय सामने पाहता, भारत जूनमध्ये एक सामना खेळत आहे, मग तो निश्चितपणे संघात बसतो, ज्या प्रकारचा फॉर्म त्याने दाखवला आहे. पण, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार्या २०२४ च्या विश्वचषकाबद्दल बोलताना, त्याआधी आयपीएलमध्ये खेळाडूंचा फॉर्म पाहणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण विश्वचषक संघासाठी निवड करण्याबद्दल बोलू शकतो.”
तीन वर्षे फॉर्मात राहिल्यानंतर कोहलीने २०२२ पासून खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये आणि आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या. १३९.८२ चा स्ट्राइक रेटने दोन शतके आणि सहा अर्धशतके देखील झळकवली आहेत.
कोहलीच्या सध्याच्या फॉर्मचे मूल्यांकन करताना, गावसकर यांनी पुनरुच्चार केला की, “३४ वर्षीय खेळाडू आगामी सामन्यांसाठी भारताच्या टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र आहे.” ते पुढे म्हणतात, “भारताच्या आगामी सामन्यांसाठी सध्याच्या फॉर्मेटमध्ये विराट माझ्या टी२० संघात नक्कीच असेल. त्याने [IPL 2023 मध्ये] दोन शतके झळकावली आहेत. टी२० क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकणेच काय , अगदी ५० धावा करणे देखील कठीण आहे. या महान फलंदाजाने दोन शतके ठोकली आहेत. जर मी निवडकर्ता असतो आणि भारत या वर्षी जूनमध्ये टी२० खेळत असतो, तर मी निःसंशयपणे त्याला संघात घेईन.” जुलै-ऑगस्टमध्ये भारताला कॅरिबियन भूमीवर वेस्ट इंडिजविरुद्ध ५ टी२० सामने खेळण्याची अपेक्षा आहे.