Sunil Gavaskar Lashes Out at Virat Kohli: भारताचे माजी कर्णधार आणि दिग्ग्ज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गावसकरांनी विराट कोहली आणि स्टार स्पोर्ट्सला एकाचवेळी सुनावलं आहे. विराट कोहली चांगला फॉर्मात असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर मात्र चर्चा सुरू होती. अनेक दिग्गजांनी त्याच्या स्ट्राईक रेटवर वक्तव्य केले होते. यावरचं विराट कोहलीने वक्तव्य दिले होते. या वक्तव्यावर उत्तर देताना गावसकरांनी विराटला तिखट शब्दात सुनावले आहे. तर विराटआधी स्टार स्पोर्ट्सवरही गावसकर भडकले, काय कारण आहे, पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार स्पोर्ट्सने विराट कोहलीचे सामन्यानंतरचे वक्तव्य वारंवार टेलिकास्ट केले, ज्यामुळे गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर संतापले आणि म्हणाले की असे करून ते आपल्याच कॉमेंट्री टीमवर टीका करत आहेत. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरील वक्तव्याला उत्तर देताना गावसकर म्हणाले, “स्ट्राईक रेट ११८ असताना समालोचकांनी प्रश्न केला. मला नेमकी खात्री नाही. मी जास्त सामनेही पाहत नाही. त्यामुळे इतर समालोचक काय म्हणाले, हे मला माहित नाही. पण जर तुम्ही सलामीला आला आहात आणि तुमचा स्ट्राईक रेट ११८ आहे आणि त्यासह १४व्या किंवा १५ व्या षटकात तुम्ही बाद होत आहात, तर हे चुकीचे आहे. यासाठी जर तुम्ही टाळ्या वाजवून तुमचे कौतुक व्हावे असा विचार करताय तर हे थोडं विचित्र आहे.” असे गावसकर म्हणाले.

सुनील गावसकरांनी स्ट्राईक रेटवरून विराटला सुनावलं

गावसकरांनी पुढे बोलताना कोहलीलाच प्रश्न करत म्हणाले, “तुम्ही जेव्हा सगळ्यांना सांगता की बाहेर कोण काय बोलतं याची मी पर्वा करत नाही, मला फरत पडत नाही. अच्छा! अरे मग तुम्ही बाहेर कोण काय बोलतंय यावर उत्तर का देताय… आम्हीही थोडं फार क्रिकेट खेळलो आहोत. आम्ही जे काही पाहतो त्याबद्दलचं आम्ही बोलतो.”

IPL च्या १७व्या हंगामात सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्ससाठी तज्ञ समालोचक म्हणून काम करत आहेत. स्टार स्पोर्ट्सवर गेल्या आठवड्यापासून विराट कोहलीचा व्हीडिओ वारंवार दाखवला जात होता, ज्यामध्ये विराटने त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल टीकाकारांवर जोरदार निशाणा साधला होता, त्याला प्रत्युत्तर देताना सुनील गावस्करही भडकले.

विराट स्ट्राईक रेटबद्दलच्या म्हणाला होता, “जे लोक स्ट्राइक रेटबद्दल आणि मी फिरकीविरुद्ध चांगला खेळत नाही बोलतात, हे तेच लोक आहेत ज्यांना याबद्दल बोलायला आवडते. पण माझ्यासाठी नेहमी संघाला सामना जिंकून देणे हेच ध्येय राहिले आहे. त्यामुळेच मी १५ वर्षांपासून हे करू शकलो आहे. तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही दररोज मेहनत करत असता.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar lashes at virat kohli on his strike rate statement said why reply if you dont care about outside noise bdg