IPL 2025 Sunil Gavaskar Playing with Robo Dog Champak Video: आयपीएल २०२५ मध्ये २४ एप्रिलला राजस्थान रॉयल्स आणि रॉल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. आरसीबीने राजस्थानचा अखेरच्या षटकांमध्ये पराभव करत घऱच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला. या सामन्यापूर्वी संघ मैदानावर सराव करत असतानाच सुनील गावस्करांचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
भारताचे ७५ वर्षीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर जणू लहान मुलांप्रमाणे मैदानावर रोबोटबरोबर खेळताना दिसले. आयपीएल २०२५ मध्ये ब्रॉडकास्टिंगसाठी आलेला रोबोट डॉग चंपकबरोबर सुनील गावस्कर खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या रोबोट डॉगचं नाव चंपक ठेवण्यात आलं आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान तो मैदानावर फिरताना दिसतो.
आयपीएल २०२५ मध्ये हा रोबो डॉग खूप व्हायरल होत आहे. काही खेळाडूदेखील त्याच्यासोबत मजा करताना दिसतात तर कधीकधी तो खेळाडूंची कॉपी करताना दिसतो. धोनीसह रोबो डॉगच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. चार पायांसह असणारा हा रोबोट रिमोटने कंट्रोल केला जातो. डॉगप्रमाणेच तो खेळाडूंना हात देखील मिळवतो.
आता गावस्करांनी देखील या चंपकबरोबर खूप मजा केली आहे. गावस्कर जसं चालत होते, धावत होते, त्यांच्याप्रमाणेच तो रोबोटदेखील मस्ती करताना दिसला. इतकंच नव्हे तर त्याने उडीसुद्धा मारली. शेवटी, जेव्हा लिटिल मास्टर चंपकसह खेळून निघून गेले, तेव्हा हा रोबोट त्यांच्या मागे जाऊ लागला. गावस्करांचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यापूर्वी लहान मुलांप्रमाणे जल्लोष करत भारतीय संघाचा आनंद साजरा करतानाही गावस्करांचे काही व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर विजयी घोडदौड सुरू केली असून गुणतालिकेत चौथ स्थान गाठलं आहे.