Sunil Narine 4th Player To Play 500th T20 Match : आयपीएल २०२४ च्या १० व्या सामन्यात आज (२९ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा सामना खेळायला उतरताच केकेआरचा स्टार खेळाडू सुनील नरेनने एक ऐतिहासिक पराक्रम केला आहे, टी-२० फॉरमॅटमध्ये ५०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तो जगातील केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.
कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील आयपीएल सामना फिरकीपटू सुनील नरेनसाठी खूप खास आहे. कारण हा त्याचा टी-२० फॉरमॅटमधील ५०० वा सामना आहे. त्याने आतापर्यंत ४९९ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ५३६ विकेट्स आहेत. त्याच्या आधी किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि शोएब मलिक यांनी ही कामगिरी केली आहे. पोलार्ड हा क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर ६६० सामन्यांची नोंद आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू –
किरॉन पोलार्ड – ६६० सामने
ड्वेन ब्राव्हो – ५७३ सामने
शोएब मलिक – ५४२ सामने
सुनील नरेन – ५००* सामने
आंद्रे रसेल – ४८३ सामने
हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या
सुनील नरेनची टी-२० कारकीर्द –
२०११ मध्ये पदार्पण केल्यापासून, नरेनने टी-२० फॉरमॅटमध्ये बॉल आणि बॅट दोन्हीसह शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ५३६ विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत तो फक्त ड्वेन ब्राव्हो (६२५) आणि राशिद खान (५६६) मागे आहेत. नरेनचा इकॉनॉमी रेट ६.१० आहे, जो त्यांच्या टी-२० कारकिर्दीत २००० पेक्षा जास्त चेंडू टाकलेल्या खेळाडूंमध्ये दुसरा सर्वोत्तम आहे. सॅम्युअल बद्रीच्या कारकिर्दीत १९७ सामन्यांतील सर्वोत्तम इकॉनॉमी रेट ६.०८ आहे. ऑफस्पिनर नरेननेही आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३० मेडन षटके टाकली आहेत, जी पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च आहे.
कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली –
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अनुकुल रॉयने केकेआर संघात प्रवेश केला आहे. तर आरसीबी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजी करत आहे.
हेही वाचा – MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.