वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्राम आणि ट्विटरद्वारे त्याने हा निर्णय जाहीर केला. किरॉनच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. वेस्ट इंडिजचा खेळाडू सुनील नारायण यालादेखील किरॉनचा हा निर्णय ऐकून दु:ख झाले आहे. किरॉनच्या या निर्णयावर सुनील नारायणने प्रतिक्रिया दिली असून किरॉन पोलार्डचे क्रिकेट अजून संपलेले नाही. वेस्ट इंडिज क्रिकेटला देण्यासाठी त्याच्याकडे अजून खूप काही आहे, असे नारायणने म्हटले आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 MI vs CSK : दोन्ही संघांसाठी ‘आज करो या मरो’चा सामना; मुंबईला रोहितचं टेन्शन तर चेन्नईला ऋतूराजकडून अपेक्षा

“किरॉनचा निर्णय हा दु:खदायक आहे. मला वाटतं की त्याच्याकडे वेस्ट इंडिज क्रिकेटला देण्यासाठी खूप काही आहे. पण योग्य वेळ आल्याचे त्याला माहिती असावे आणि तेच महत्त्वाचे आहे. मी त्याला खूप खूप शुक्षेच्छा देतो. यानंतर तो ज्या स्पर्धेत खेळेल त्या स्पर्धेमध्ये त्याला भरगोस यश मिळेल याची मला खात्री आहे,” असे सुनील नारायण म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022, DC vs PBKS : एकट्या वॉर्नरने खेचून आणला विजय, मैदानातच केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

त्याचबरोबर सुनील नारायणने किरॉन पोलार्डच्या फॅन फॉलोईंगबद्दलही भाष्य केलं. “लोकांना त्याला वेस्ट इंडिजसाठी खेळताना पाहायला आवडतं. मला वाटतं की तो आगामी काळात जगभरातील टी-२० क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित करेल आणि टी-२० क्रिकेटचा तो आनंद घेतो असे मला वाटते,” असे नारायण म्हणाला. तसेच पुढे बोलताना “किरॉन पोलार्डमध्ये आणखी खूप सारं क्रिकेट आहे. हा शेवट नाहीये. आगामी काळात किरॉन पोलार्डकडून आणखी काहीतरी चांगला पाहायला मिळणार याची मला खात्री आहे,” असेदेखील नारायण म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022, PBKS vs DC : दिल्लीने ११ षटकांत सामन्यावर कोरलं नाव, पंजाबचा किंग्जचा लाजीरवाणा पराभव

किरॉन पोलार्डने २० एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली. यावेळी “दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहायचो. मागील १५ वर्षांपासून मी एकदीवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र आता पूर्ण विचाराअंती मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे पोलार्डने सांगितले.

हेही वाचा >>> आयपीएल सुरु असतानाच किरॉन पोलार्डचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास

दरम्यान, सुनील नारायण आणि किरॉन पोलार्ड हे दोघेही कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये त्रिनबँगो नाईट रायडर्सकडून सोबत खेळतात. या स्पर्धेत कॅरेबियन नाईट रायडर्सने आतापर्यंत चार वेळा जेतेपद पटकावलेले आहे. किरॉन पोलार्ड आणि सुनिल नारायण हे बलपणीचे मित्रदेखील आहेत.