कोलकाता नाइट रायडर्ससाठी एक आनंदाची बातमी असून त्यांचा अव्वल फिरकीपटू सुनील नरिनचा आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दिला असून त्याचबरोबर त्याला अखेरची ताकीदही दिली आहे.
चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेमध्ये नरिनच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आयपीएलच्या सामन्यादरम्यानही त्याची शैली अवैध असल्याचे म्हटले गेले होते. त्यामुळे २८ एप्रिलनंतर त्याला आयपीएलमध्ये एकही चेंडू टाकता आला नव्हता. त्यानंतर बीसीसीआयच्या गोलंदाजी समितीने त्याच्या गोलंदाजीची तपासणी केली असून त्याच्या गोलंदाजीला मान्यता दिली आहे.
‘‘नरिनची विनंती स्वीकारून त्याच्या गोलंदाजी शैलीची आम्ही तिसरी जैविक चाचणी घेतली. चेन्नईमध्ये त्याच्या गोलंदाजीची चाचणी करण्यात आल्या नंतर त्याने गोलंदाजी शैलीमध्ये काही बदल केल्याचे जाणवले. या बदलानुसार त्याची गोलंदाजी वैध ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे,’’ असे बीसीसीआयने पत्रकामध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा