सुनील नरेनने आयपीएलमधील सातत्यपूर्ण खेळानंतर त्याने पहिले वहिले आयपीएल शतक झळकावले आहे. इडन गार्डन्सवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात नरेन ही कामगिरी केली आहे. अवघ्या ४९ चेंडूत १०० नरेनच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले आहे. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज असलेला नरेन फलंदाजीमध्येही शानदार फॉर्मात दिसला आहे. केकेआरकडून मिळालेली सलामीवीराची भूमिका त्याने चोख बजावली आहे. केकेआरसाठी आयपीएलमधील हे फक्त तिसरे शतक आहे. याआधी ब्रेंडन मॅक्युलम (२००८) आणि वेंकटेश अय्यर (२०२३) च्या नावे ही कामगिरी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

सुनील नरेनची आयपीएलमधील धावसंख्या
१०९ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स
६ धावा वि लखनऊ सुपर जायंट्स
२७ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
८५ धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स<br>४७ धावा विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२ धावा वि सनरायझर्स हैदराबाद

सुनील नारायण हा एक अष्टपैलू खेळाडू असला तरी केकेआरचा तो एक आघाडीचा गोलंदाजही आहे. गौतम गंभीर जेव्हा केकेआरचा कर्णधार होता त्या काळात त्याने काही मोठे निर्णय घेतले, त्यातील हा एक मोठा निर्णय होता की त्याने नरेनला सलामीवीर म्हणून भूमिका दिली. गेल्या काही हंगामात तो खालच्या फळीत फलंदाजीला येत असे. पण आता पुन्हा त्याला सलामीवीराची भूमिका मिळाली आणि त्याने चोख जबाबदारी पार पाडत दणदणीत शतक झळकावले आहे.

शतक झळकावल्यानंतर पुढील षटकात सुनील नरेन बोल्टच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नरेनने बाद होण्यापूर्वी ५६ चेंडूत ६ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. नरेनच्या शतकी खेळीच्या जोरावर केकेआरने ६ बाद २२६ धावा केल्या आहेत. नरेनने अंगक्रिश रघुवंशी (३०) सोबत ५० अधिक धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. नरेनशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. नरेनने ३० धावांचा टप्पाही गाठता आला नाहीय

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे शेवटच्या सामन्यातून बाहेर असलेला रविचंद्रन अश्विन आणि जोस बटलर रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत, तर नाइट रायडर्सने त्यांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil narine hits maiden ipl century from kolkata knight riders in kkr vs rr match bdg