IPL 2025 Sunil Shetty Reaction on KL Rahul Kantara Celebration: आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स वि. केकेआरचा सामना खेळवला जात आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. या सामन्यादरम्यान केएल राहुलचे सासरे म्हणजेच बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते. जिथे त्यांनी राहुलबाबत काही गोष्टींवर वक्तव्य केलं. दरम्यान त्यांनी राहुलच्या आयपीएल २०२५ मधील प्रसिद्ध कांतारा सेलिब्रेशनवर वक्तव्य केलं.
केएल राहुलच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरूद्ध गमावलेला सामना जिंकला होता. केएल राहुलने त्या सामन्यात ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मूळचा बंगळुरूचा असलेल्या केएल राहुलने त्याच्या घरच्या मैदानावर आरसीबीविरूद्ध उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयाच्या हिरो ठरला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर राहुलने केलेल्या सेलिब्रेशन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केएल राहुलने दिल्लीला विजयासाठी एक धावेची गरज असताना शानदार षटकार लगावला. त्यानंतर बॅट उभी जमिनीवर आदळली आणि आपल्या विजयाचं कांतारा स्टाईल सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशननंतर त्याने खुणैवत हे माझं होमग्राऊंड असल्याचं सर्वांना दाखवलं. राहुलने खेळीनंतर खाली जमिनीकडे हात दाखवला आणि त्यानंतर स्वत:कडे बोट दाखवत विजयी खेळीचं सेलिब्रेशन केलं. राहुलच्या त्याच्या आक्रमकतेचं एक कारण म्हणजे बेंगळुरू हे त्याचं होमग्राउंड आहे. पण नंतर दिल्लीच्या घरच्या मैदानावर आरसीबीने दिल्लीचा पराभव करत या पराभवाचा बदला घेतला.
राहुलच्या या सेलिब्रेशनबाबत त्याचे सासरे सुनील शेट्टी म्हणाले, हो मी ते सेलिब्रेशन पाहिलं होतं. आताही त्या सेलिब्रेशनबद्दल तुम्ही बोलताय आणि माझ्या अंगावर काटा आला. कारण असा क्षण प्रत्येक खेळाडूच्या जीवनात आला पाहिजे. जिथे त्याला स्वत:वर विश्वास असतो की मी हे करू शकतो आणि मी हे करून दाखवलं आहे. मी त्याला असं पहिल्यांदा कॉल केला आणि सांगितलं की, हाच राहुल आम्हाला पाहायचा आहे. यामागचं कारण म्हणजे विश्वास.
पुढे सुनी ल शेट्टी म्हणाले, हा विश्वास वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दिसलाय, की मी सामना फिनिश करू शकतो, माझा माझ्यावर विश्वास आहे. कारण आजकाल एका क्रिकेटरच्या जीवनात खूप प्रॉब्लेम आहेत. अनेक लोक आहेत जे त्यांना सांगत असतात, कसं खेळलं पाहिजे काय केलं पाहिजे, या परिस्थितीत असं खेळलं पाहिजे. खूप अवघड आहे.”