आयपीएलच्या मिनी लिलावात १३ खेळाडूंना खरेदी करण्यात आले. हैदराबादने (Sunrisers Hyderabad) इंग्लंडच्या हॅरी ब्रूकसाठी सर्वाधिक पैसा खर्च केला. त्याच वेळी हैदराबादने पंजाब किंग्जचा माजी कर्णधार मयंक अग्रवालसाठी ८.२५ कोटी रुपये खर्च केले. सनरायझर्सने त्यांचा कर्णधार केन विल्यमसनलाही लिलावापूर्वी वगळले. अशा स्थितीत मयंक संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो. हॅरी ब्रूक आणि मयंक व्यतिरिक्त हैदराबादने हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंग, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव, मयंक डागर, विव्रत शर्मा, सनवीर सिंग, समर्थ व्यास, अकिल हुसेन, मयंक मार्कंडे आणि आदिल रशीद यांना खरेदी केले.