सनरायझर्स हैद्राबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबाबत माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात फक्त दोन षटक गोलंदाजी केली होती. यामुळं वसीम जाफरने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने टीम मॅनेजमेंटला खडे बोल सुनावले आहेत. जाफर म्हणाला, जर तुम्हाला उमरान मलिकवर विश्वास नसेल, तर त्याला खेळवू नका. त्याच्या जागेवर कोणत्यातरी फलंदाजाचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात उमरान मलिकला पूर्ण स्पेल गोलंदाजी करू दिली नाही. उमरान मलिकला फक्त दोन षटक फेकण्यासाठी देण्यात आले. याचदरम्यान उमरान मलिकने १४ धावा देत एकही विकेट घेतला नाही. उमरान मलिकने आतापर्यंत सहा सामने खेळले असून पाच विकेट्स घेण्यात त्याला यश मिळालं आहे. अनेक सामन्यात त्याने चार षटकांचा कोटा पूर्ण केलेला नाही.

नक्की वाचा – ३६ सामन्यांमध्ये ‘असा’ शॉट पाहिला नसेल; यशस्वी जैस्वालच्या गगनचुंबी षटकाराची का होतेय चर्चा? Video एकदा पाहाच

उमरान मलिकवर SRH ला विश्वास नाही – वसीम जाफर

वसीम जाफरच्या म्हणण्यानुसार, जर सनरायझर्स हैद्राबाद फ्रॅंचायचीला उमरान मलिकवर विश्वास नसेल, तर त्याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला नाही पाहिजे आणि त्याला बाहेर ठेवलं पाहिजे. वसीम जाफरने ईएसपीएन क्रिकइन्फोला प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे. दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या सामन्यादरम्यान ६२ धावांवर पाच विकेट्स अशी होती. परंतु, हैद्राबादच्या खराब गोलंदाजीमुळं दिल्लीची धावसंख्या १४४ पर्यंत पोहोचली. चांगली गोलंदाजी झाली असली तर दिल्लीला कमी धावांवर रोखता येई शकलं असतं.