Kaviya Maran Viral Video : आयपीएलच्या १६ व्या हंगामात एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत असून नवनवीन व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सनरायझर्स हैद्राबादने आतापर्यंत तीन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या १४ व्या सामन्यात एडन मार्करच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैद्राबाद संघाने पंजाब किंग्जचा पराभव केला. परंतु, या सामन्यात एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला.

पंजाब किंग्जची फलंदाजी सुरु असताना १९ व्या षटकात कॅमेरामनने सनरायझर्स हैद्राबाद संघाची मालकीन काव्या मारनला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. पण काव्याला कॅमेरामनची ही कृती अजिबात आवडली नाही. काव्याने कॅमेरामनवर संताप व्यक्त करत ‘हट रे’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. काव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काव्याने दिलेली रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली असून इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…

नक्की वाचा – पराभव झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन भडकला, संघाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला, “अशा खेळपट्टीवर…”

पंजाब किंग्जने २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले हैद्राबादचे फलंदाज मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रुक स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार एडन मार्करमे सावध खेळी करत संघाचा डाव सावरला. त्रिपाठीने ७४ धावा केल्या. तर मार्करम ३७ धावांवर नाबाद राहिला. या धावांच्या जोरावर हैद्राबाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.