Washington Sundar out of ipl 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएल २०२३ च्या उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकणार नाही. सनरायझर्स हैदराबादने ट्विट करून सुंदरच्या बाहेर पडल्याची माहिती दिली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले की, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर आयपीएल २०२३ मधीलच उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मात्र, हैदराबादने सुंदरच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

वॉशिंग्टन सुंदर आयपीएलच्या १६ व्या हंगामात बॅट आणि बॉलने अद्याप प्रभावी ठरला नव्हता. सुंदरने आयपीएल १६ मध्ये खेळल्या गेलेल्या ७ सामन्यांच्या पाच डावांमध्ये १५ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने केवळ ६० धावा केल्या. यावेळी सुंदरची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद २४ धावा होती.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Supreme Court on bulldozer action
SC on Bulldozer Action: ‘बुलडोझर कारवाई’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

गोलंदाजीतही सुंदरने या मोसमात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या मोसमात सुंदरने ७ सामन्यात १७.४ षटके टाकत केवळ तीन विकेट घेतल्या. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुंदरने एकाच सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, तर उर्वरित ६ सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट विकेट घेता आली नाही.

हेही वाचा – IPL 2023 KKR vs RCB: व्यंकटेश अय्यरने विराट कोहलीचा शानदार झेल घेताच अनुष्का झाली निराश, पाहा VIDEO

हैदराबादला सुंदरची उणीव भासेल –

मात्र, सुंदर खेळत नसल्याने मधल्या फळीत सनरायझर्स हैदराबादला त्याची उणीव भासेल. एवढेच नाही तर स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल तसतशी खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त ठरतील. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरची अनुपस्थिती हैदराबादसाठी मोठा धक्का आहे.

सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत ९व्या स्थानावर –

या मोसमात मोठ्या खेळाडूंवर बोली लावूनही सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे.

वॉशिंग्टन सुंदरची आयपीएल कारकीर्द –

भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने या मोसमात फार काही केले नसेल, पण त्याची आयपीएल कारकीर्द तितकीशी वाईट नाही. २०१७ मध्ये पदार्पण करणाऱ्या सुंदरने ५८ आयपीएल सामने खेळले असून ७.३६ च्या इकॉनॉमी रेटने ३६ विकेट घेतल्या आहेत. १६ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सुंदरने आयपीएल कारकिर्दीत ३७८ धावा केल्या आहेत.