Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad Score Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सीजनचा १० वा सामना आज शुक्रवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरु आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैद्राबादच्या फलंदाजांची लखनऊच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली.

पॉवर प्ले मध्ये क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर पांड्याने कर्णधार एडम मार्करमचा शून्यावर त्रिफळा उडवत हैद्राबादला मोठा धक्का दिला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने सावध खेळी करत ४१ चेंडूत ३५ धावा केल्या. पण इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैद्राबादने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १२१ धावा केल्या. त्यामुळे लखनऊला विजयासाठी १२२ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

लखनऊकडून क्रुणाल पांड्याने हैद्राबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालला ८ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर अनमोलप्रीत सिंगने हैद्राबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिंग ३१ धावांवर असताना पांड्याने त्यालाही बाद केलं. त्यानंतर रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुक अवघ्या तीन धावांवर बाद झाला अन् हैद्राबादची चौथी विकेट गेली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आण वॉशिंग्टन सुंदरने सावध खेळी करत हैद्राबादच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. राहुल त्रिपाठीने ४१ चेंडूत ३५ धावांची खेळी साकारली तर सुंदरने २८ चेंडूत १६ धावा केल्या. अब्दुल समदने १० चेंडूत २१ धावा कुटल्या.

नक्की वाचा – World Record: बांगलादेशच्या ‘या’ फलंदाजाची विश्वविक्रमाला गवसणी; ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्ससाठी क्रुणाल पांड्याने चार षटकात फक्त १८ धावा देत ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. रवी बिष्णोईने चार षटकांत १६ धावा देत एक विकेट घेतली. अमित मिश्रानेही भेदक गोलंदाजी करत हैद्राबादच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. अमित मिश्राने सुंदरला आणि आदिल राशिदला बाद करत दोन विकेट्स घेतल्या. तसंच यश ठाकूरने सेट झालेला फलंदाज राहुल त्रिपाठीला बाद करून लखनऊला महत्वाची विकेट मिळवून दिली.