Harry Brook Eating Rasgulla Viral Video : इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात आयपीएल २०२३ मधील पहिलं शतक ठोकलं. तसंच कर्णधार एडन मार्करमनेही आक्रमक फलंदाजी करून अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे सनरायझर्सने कोलकाताचा २३ धावांनी पराभव केला. ब्रूकच्या नाबाद १०० आणि मार्करमच्या ५० धावांच्या जोरावर हैद्राबादने २० षटकांत २२८ धावा कुटल्या. ब्रूकने ५५ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. केकेआरच्या विजयात ब्रूकचा सिंहाचा वाटा होता. ज्यामुळे ब्रूकला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केकेआरचा पराभव केल्यानंतर सनरायझर्सच्या खेळाडूंनी जल्लोष केला. हॉटेलमध्ये ब्रूकचं स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे मेजवानी सुरु असताना ब्रूकने भारतीय खाद्यपदार्थ रसगुल्ल्यावर ताव मारला. सनरायझर्स हैद्राबादने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. कोलकाता रसगुल्ल्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. अशातच ब्रूकनेही कोलकाताच्या रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला.

नक्की वाचा – W W W, किवी गोलंदाजाने रचला इतिहास! पाकिस्तानी फलंदाजांना गुंडाळलं, पाहा विकेट हॅट्रिकचा Video

इथे पाहा व्हिडीओ

ब्रूकला आयपीएल लिलावात हैद्राबादने १३ कोटींना खरेदी करून टीममध्ये सामील केलं होतं. सुरुवातीच्या सामन्यात ब्रूकला धावांचा सूर गवसला नाही. परंतु, शुक्रवारी झालेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ब्रूकला सलामी करण्याची संधी मिळाली आणि या फलंदाजाने आयपीएल २०२३ मधील पहिलं शतक ठोकलं. हॅरी ब्रूकने पाकिस्तान सुपर लिगमध्येही शतकी खेळी केली आहे. त्यामुळे ब्रूक पीएसएल आणि आयपीएलमध्ये शतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.