Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals IPL Latest Score Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. सनरायझर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारत दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी तगडं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना १९८ धावांचा पाठलाग करताना अपयश आलं. फिलीप सॉल्ट आणि मिचेल मार्शने धडाकेबाज फलंदाजी केली. सॉल्टने ३५ चेंडूत ५९ धावा तर मिचेल मार्शने ३९ चेंडूत ६३ धावा कुटल्या. पण त्यांना दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेता आलं नाही. हैद्राबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून दिल्लीच्या ६ फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे २० षटकात दिल्लीने १८८ धावा केल्यानं सनरायझर्सचा या सामन्यात ९ धावांनी विजय झाला.

दिल्ली कॅपिटल्ससाठी मयंक मार्कंडेने दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, होसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्माला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. सनरायझर्स हैद्राबादसाठी सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडला. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत अभिषेकने ३६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ६७ धावांची खेळी साकारली. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेक बाद झाला आणि सनरायझर्सला मोठा धक्का बसला. त्यानंतर मयंक अग्रवाल इशांत शर्माच्या गोलंदाजीवर अवघ्या ५ धावांवर झेलबाद झाला. राहुल त्रिपाठीलाही धावांचा सूर गवसला नाही. तो १० धावा करून तंबूत परतला. कर्णधार एडन मार्करमही धावांसाठी संघर्ष करत होता. त्यालाही मिचेल मार्शने ८ धावांवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हॅरी ब्रुकला तर भोपळाही फोडता आला नाही.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

पण हेन्री क्लासेन आणि अब्दुल समदने दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. क्लासेनने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ५३ धावांची नाबाद खेळी केली. तर अब्दुल समदने २८ धावा केल्या. समदलाही मिचेल मार्शने बाद केलं. पण त्यानंतर होसेन १० चेंडूत १६ धावा करत नाबाद राहिला. दिल्लीसाठी मिचेल मार्शने अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकात २७ धावा देत चार विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि इशांत शर्माला प्रत्येकी एक विकेट मिळाली.