Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals IPL Latest Score Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. सनरायझर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारत दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी तगडं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना १९८ धावांचा पाठलाग करताना अपयश आलं. फिलीप सॉल्ट आणि मिचेल मार्शने धडाकेबाज फलंदाजी केली. सॉल्टने ३५ चेंडूत ५९ धावा तर मिचेल मार्शने ३९ चेंडूत ६३ धावा कुटल्या. पण त्यांना दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेता आलं नाही. हैद्राबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून दिल्लीच्या ६ फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे २० षटकात दिल्लीने १८८ धावा केल्यानं सनरायझर्सचा या सामन्यात ९ धावांनी विजय झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा