Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL Match Updates : आयपीएल २०२३ चा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात रंगला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कमालीचा फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ३५ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकात २ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शेवटच्या षटकात १७ धावांची आवश्यकता असताना अब्दुस समदने अप्रतिम फलंदाजी केली अन् हैद्राबादने या सामन्यात विजय संपादन केलं. संदीप शर्माने फेकलेला नो बॉल हैद्राबादच्या विजयाचा केंद्रबिंदू ठरला. शेवटच्या षटकात समदने षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला.

अमोलप्रीत सिंगने २५ चेंडूत ३३ धावांची खेळी करून सनरायझर्स हैद्राबादला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सिंग झेलबाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेऊन ३४ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीनं ५५ धावा कुटल्या. मात्र, आश्विनच्या गोलंदाजीवर शर्माही अर्धशतक करून तंबूत परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. तर हेनकी क्लासेनने १२ चेंडूत २६ धावा केल्या. मात्र, चहलने भेदक मारा करून दोन्ही फलंदाजांना बाद केलं आणि हैद्राबादला मोठा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन फिलिफ्सने षटकार हॅट्रिक मारून ७ चेंडूत २५ धावा केल्या. फिलिप्सने हैद्राबादला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शिमरन हेटमायरने त्याचा जबरदस्त झेल घेतला.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Amit Shah canceled four Nagpur meetings and left for Delhi sparking political speculation
विदर्भातील सर्व सभा तडकाफडकी रद्द करून अमित शहा दिल्लीला
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत

राजस्थानसाठी सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने १६ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकार ठोकून ३५ धावा कुटल्या. मार्को जेनसेनच्या गोलंदाजीवर जैस्वाल झेलबाद झाला. त्यानंतर बटलरने हैद्राबादच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. बटलरने ५९ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीनं ९५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. भुवनेश्वर कुमारने सटीक यॉर्कर टाकून बटलरला बाद केलं आणि राजस्थानला मोठा धक्का दिला.

परंतु संजून सॅमसनने शेवटच्या षटकातही चौकार षटकारांचा पाऊस पाडला अन् राजस्थानची धावसंख्या दोनशे पार करण्यात यशस्वी ठरला. संजूने ३८ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं ६६ धावांची नाबाद खेळी केली. यशस्वी जैस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ३५ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकात २ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सनरायझर्स हैद्राबादला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.