Suresh Raina Explained MS Dhoni Retirement Plan : आयपीएल २०२३ सुरु झाल्यापासून चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की, धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम कधी आहे? गेल्या काही दिवसांपूर्वी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी धोनीला त्याच्या रिटायरमेंट प्लॅनबाबत विचारलं होतं. यावर उत्तर देत धोनी म्हणाला, तुम्ही म्हटलं हे माझं शेवटचं आयपीएल आहे, मी असं म्हणालो नाही. धोनीच्या या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांना दिलासा मिळाला. अशातच आता धोनीच्या निवृत्तीबाबत त्याचा मित्र सुरेश रैनाने खुलासा करत प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, रैनाने धोनीच्या निवृत्तीबाबत खुलासा करत म्हटलं आहे की, जेव्हा मी धोनीला भेटलो, तेव्हा माहीने त्याच्या आयपीएलच्या फ्यूचर प्लॅनबाबत चर्चा केली. मी ट्रॉफी जिंकून आणखी एक वर्ष खेळेल, असं धोनीनं म्हटलं. रैनाने अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
यावर्षी धोनी फलंदाजीतही कमाल करताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात पुन्हा एकदा सीएसके प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याच्या जवळ आहे. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये सीएसकेनं आयपीएलमध्ये चारवेळा जेतेपद पटकावलं आहे. यावेळी सीएसकेनं आयपीएलचा किताब जिंकल्यास मुंबई इंडियन्सनंतर सीएसके आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा संघ ठरेल.