Suryakumar Yadav Statement About His Performance : मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बुधवारी रंगतदार सामना झाला. पंजाब किंग्जने मुंबईला विजयासाठी २१५ धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. परंतु, मुंबईच्या पलटणमध्ये धडाकेबाज फलंदाजांची मांदीयाळी असल्याने या सामन्यात मुंबईने पंजाबचा ६ विकेट्स राखून पराभव केला. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा जलवा दाखवून मैदानात धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमारने ३१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ६६ धावा कुटल्या. पण त्याला हा सामना फिनिश करता आला नाही. अशातच सूर्यकुमारने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सूर्यकुमार यादव म्हणाला, या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळाल्याने मला खूप आनंद झाला. परंतु, मी हा सामना फिनिश करायला हवा होता. जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा पॉजिटिव्ह माइंडसेटने फलंदाजी करणं गरजेचं होतं. मला ईशान किशनला सपोर्ट करायचा होता. कारण तो खूप चांगली फलंदाजी करत होता. मी नेहमीच अशा परिस्थितीत खेळण्यासाठी तयारी करत असतो. माझे सर्व प्लॅन क्लियर असतात आणि जेव्हा मी फलंदाजीसाठी जातो त्यावेळी मी स्वभाविक गेम खेळण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे पॉवर गेम नाही. पण मी अचूक टायमिंगवर चेंडूला मैदानाबाहेर पाठवतो. या भागिदारीमुळं मुंबईचा विजय झाला, हे पाहून मी खूप खूश झालो.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – मुंबई इंडियन्सची शान ‘ईशान’; हरप्रीत ब्रारला ठोकला ९८ मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा Video

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनेही चौकार षटकारांचा पाऊस पाडला. सूर्यकुमारने आजच्या सामन्यातही आक्रमक फलंदाजी करून अर्धशतक ठोकलं आणि मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. सॅम करनच्या एका षटकात सूर्यकुमारने २३ धावा कुटल्या. सूर्यकुमारने ३१ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारली. नेथन एलिसच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार झेलबाद झाला. अर्शदीप सिंगने सूर्यकुमारचा अप्रतिम झेल पकडून मुंबईला मोठा धक्का दिला. सूर्यकुमारने २ षटकार आणि ८ चौकार ठोकले.

Story img Loader