IPL 2025, Rishabh Pant- Axar Patel Funny Video: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान टॉसवेळी अक्षर पटेल आणि ऋषभ पंत मस्ती करताना दिसून आले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लखनऊ सुपर जांयट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. या सामन्यातही नाणेफेकीच्या वेळी तो अक्षर पटेलसोबत मस्ती करताना दिसून आला. या सामन्यात अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणार असल्याचं मॅच रेफ्रीला सांगितलं. त्यावेळी ऋषभ पंत त्याला म्हणाला, “बॅटिंग घे ना भावा..” हा मजेशीर व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
कोण मारणार बाजी?
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप ५ मध्ये असलेले संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ५-५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना रिषभ पंत आणि केएल राहुल या दोन्ही खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण दोन्ही संघ आपल्या आधीच्या संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत. सध्या ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे.
यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तर गेल्या हंगामात केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र यावेळी केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. तर ऋषभ पंतकडे लखनऊ सुपर जायंट्स संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), अब्दुल समद, डेविड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंह राठी, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव
दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार