Tamilnadu CM M K Stalin On MS Dhoni : देशात आयपीएल २०२३ चा हंगाम सुरु असून तमाम क्रिकेटप्रेमी रंगतदार सामने पाहण्यात व्यग्र झाले आहेत. मात्र, धोनीच्या चाहत्यांचा मोठा वर्ग चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीला चिअर अप करण्यासाठी प्रत्येक मैदानात पोहोचत आहे. चेन्नईचा सामना असला की संपूर्ण स्टेडियम पिवळ्या रंगाच्या कपड्यांनी बहरलेलं असतं. कारण अनेकांना वाटतंय की, यंदाचा आयपीएल हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम आहे. अशातच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी धोनीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धोनी तामिळनाडूचा ‘दत्तक मुलगा’ आहे. धोनीचा मी खूप मोठा चाहता आहे. पुढच्या वर्षीही धोनीनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच नेतृत्व करावं, असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
चेन्नईमध्ये तामिळनाडू चॅम्पियन फाउंडेशन आणि मुख्यमंत्री ट्रॉफीच्या लॉन्चदरम्यान स्टॅलिन यांनी म्हटलं की, तामिळनाडूत सर्वांप्रमाणे मी सुद्धआ महेंद्र सिंग धोनीचा मोठा चाहता आहे. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी मी दोनवेळा चेपॉक स्टेडियममध्ये गेले होतो. मला आशा करतो की, तामिळनाडूचा आमचा दत्तक मुलगा सीएसकेसाठी भविष्यातही खेळेल.”
स्टॅलिन यांनी पुढं बोलताना म्हटलं की, धोनी त्याने केलेल्या प्रचंड मेहनतीमुळं लोकप्रिय झाला. भारताच्या कोट्यावधी युवकांसाठी धोनी प्रेरणास्थान आहे. आम्ही तामिळनाडूत फक्त क्रिकेटच नाही तर अन्य क्रीडा विभागातही खूप सारे धोनी बनवण्यासाठी प्रयत्त करत आहोत.
चारवेळा CSK ला आयपीएलमध्ये जिंकवलं
महेंद्र सिंग धोनी १५ वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या १५ वर्षात त्याने आपल्या संघाला चारवेळा आयपीएल किताब जिंकवून दिला आहे. सीएसकेनंतर मुंबई इंडियन्सने आयपीएलचा किताब पाचवेळा जिंकला आहे. २००८ मध्ये सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीने सीएसकेला फायनलमध्ये पोहोचवलं होत. परंतु, राजस्थान रॉयल्सने आयपीएल्या पहिल्या हंगमात सीएसकेचा पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला होता.