Ravi Shastri Statement On Virat kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी खेळाडू गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादविवादाची संपूर्ण क्रीडाविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता एक नवा व्हिडीओ समोर आल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराह कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. समालोचक जतिन सप्रूने चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. एका शो दरम्यान सप्रूने शास्त्री यांना विचारलं की, जेव्हा तुम्ही टीम इंडियाचे कोच होते, त्यावेळी विराटच्या अॅग्रेशनवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएलच्या ऑफिशियल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “मला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता लागली नाही. कारण तुम्ही ज्या अग्रेशनमुळं ज्या गेमपर्यंत पोहोचला आहात, ते दाखवा..यामुळे दुसऱ्या संघावरही याचा परिणाम होतो.” याचदरम्यान शोमध्ये सहभाग घेतलेला भारताचा माजी गोलंदाज श्रीसंथ म्हणाला, धोनीनं मलाही असं काही करु दिलं पाहिजे होतं. यावर बोलताना शास्त्री म्हणाले, कुणी शांत स्वभावाचा असेल तर त्याने तसच राहिलं पाहिजे. टीम इंडियात येऊन कुणालाही त्याचा खेळ बदलण्याची आवश्यकता नाही. तुमचा तोच खेळ, तीच स्ट्रेंथ तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. मग त्यात बदल का करायचा? असा सवाल शास्त्री यांनी उपस्थित केला.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ

नक्की वाचा – लखनऊ सुपर जायंट्सची अवस्था ‘गंभीर’! कर्णधार के एल राहुल IPL मधून बाहेर, WTC फायनलमध्येही खेळणार नाही? कारण…

इथे पाहा व्हिडीओ

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादविवादावर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराट आणि गौतमला १०० टक्के सामन्याचं शुल्क भरण्याचा बीसीसीआयने दंड ठोठावला. त्यानंतर सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, दंड ठोठावण्यापेक्षा खेळाडूंवर एक दोन सामन्यात बंदी घायायला पाहिजे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, दोघांनीही भविष्यात गळाभेट करून वादावर पडदा टाकावा, असं मला वाटतं.