Yuvraj Singh Tweet For Virat Kohli And Gautam Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादविवादानंतर आता माजी दिग्गज क्रिकेटर्स प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. गावसकर आणि सेहवागने दोघांनाही फटकारलं आहे. अशा प्रकारचं कृत्य करून तुम्ही चाहत्यांना चूकीचा मेसेज देत आहात, अशा शब्दात त्यांनी दोन्ही खेळाडूंना सुनावलं. अशातच आता भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगने कोहली-गौतमच्या भांडणात उडी घेतली आहे. युवराजने एक ट्वीट करत दोघांनाही सल्ला दिला आहे. मजेशीर अंदाजात युवराजने ट्वीटमध्ये म्हटलंय, स्प्राईटने त्यांच्या कॅम्पेनमध्ये ‘ठंड रख’ या टॅगलाईनसाठी गौती आणि चीकूला साईन केलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? युवराजच्या या ट्वीटवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

युवराज सिंगने केलेल्या या ट्वीटवर नेटकरी सतत रिअॅक्ट करत आहेत. खरंतर युवराजन या ट्वीटच्या माध्यमातून दोघांनाही शांत राहण्याचा आवाहन केलं आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ टीमचा मार्गदर्शक गौतम गंभीर सोमवारी झालेल्या सामन्यानंतर एकमेकांसोबत भिडले होते. आरसीबीने या सामन्यात लखनऊचा १८ धावांनी पराभव केला होता. या दोघांवरही आयपीएलच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२१ चं उल्लंघन केल्यामुळं १०० टक्के सामन्याचं शुल्क भरण्याचा दंड ठोठावण्यात आला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – कोहली-गंभीरच्या भांडणानंतर सचिन तेंडुलकर अन् जॉंटी ऱ्होड्सचा Video होतोय व्हायरल, चाहते म्हणाले, “यांच्याकडून शिका…”

” त्यांना एकमेकांना सांगण्याची गरज का पडली…मी नेहमी एक गोष्ट सांगतो की, ही माणसं देशाचे आयकॉन आहेत. ते जे काही करतात किंवा सांगतात, त्या गोष्टींना लाखो मुलं फॉलो करतात. जर माझ्या आयकॉनने असं केलं आहे, तर मी पण असंच करणार, अशाप्रकारचा विचार ते करतात. खेळाडूंनी या गोष्टींची काळजी घेतली तर मैदानात अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत. बीसीसीआय एखाद्यावर बंदी घालण्याबाबत निर्णय घेत असेल, तर कदाचित अशाप्रकारच्या घटना समोर येणार नाहीत. अशाप्रकारच्या घटना अनेकदरा घडल्या आहेत. पण ड्रेसिंग रुममध्ये जे काही करायचं आहे ते करा, हेच चांगलं ठरू शकतं.”, अशी प्रतिक्रिया वीरेंद्र सेहवागने माध्यमांशी बोलताना दिली.

Story img Loader